जळगावमध्ये भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 16:28 IST2019-12-23T16:23:42+5:302019-12-23T16:28:17+5:30

या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

In Jalgaon, seven people died on the spot | जळगावमध्ये भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू

जळगावमध्ये भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू

जळगाव : एरंडोलजवळ काळीपिवळी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एरंडोलहून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्रियंका हॉटेलसमोर काळीपिवळी आणि ट्रक यांच्यात हा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. काळीपिवळी एरंडोलहून जळगावकडे प्रवाशांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. 

दरम्यान, जखमी झालेल्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, अपघातातील मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी एरंडोल तालुक्यातील उत्राण, कासोदा परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: In Jalgaon, seven people died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.