जळगावात पोलीस कर्मचाºयालाही कोरोनाची बाधा, कोविड रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 22:46 IST2020-05-18T22:45:30+5:302020-05-18T22:46:13+5:30

संबंधित कर्मचारी दक्षता नगर पोलीस लाईनमध्ये वास्तव्याला असून कुटुंबासह इमारतीतील इतर कुटुंबालाही तपासणीसाठी कोवीड रुग्णालयात नेण्यात आले आहे.

In Jalgaon, a policeman was also hit by a corona | जळगावात पोलीस कर्मचाºयालाही कोरोनाची बाधा, कोविड रुग्णालयात दाखल

जळगावात पोलीस कर्मचाºयालाही कोरोनाची बाधा, कोविड रुग्णालयात दाखल

जळगाव : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील एका शाखेतील पोलीस कर्मचाºयालाही कोरोनाची बाधा झाली असून त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. कोरोनाचे लक्षण जाणवल्याने त्याला कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वॅब घेतल्यानंतर ते तपासणीला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला.

दरम्यान, संबंधित कर्मचारी दक्षता नगर पोलीस लाईनमध्ये वास्तव्याला असून कुटुंबासह इमारतीतील इतर कुटुंबालाही तपासणीसाठी कोवीड रुग्णालयात नेण्यात आले आहे. कर्मचाºयाचे कुटुंब क्वारंटाईन करण्यात आले आहे. याआधी मालेगाव येथे गेलेले दोन पोलीस कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहेत. दरम्यान, याबाबत पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना विचारले असता अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही, परंतु तशी चर्चा मी पण ऐकली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: In Jalgaon, a policeman was also hit by a corona