जळगाव मनपा निवडणुकीचा खर्च पावणेदोन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:18 IST2018-09-13T00:17:49+5:302018-09-13T00:18:07+5:30
खर्चाची पडताळणी करण्याऱ्या कर्मचा-यांची आयुक्तांनी घेतली बैठक

जळगाव मनपा निवडणुकीचा खर्च पावणेदोन कोटी
जळगाव : महापालिका निवडणुकीचा खर्च सुमारे पावणेदोन कोटी रुपये झाला आहे. प्रशासनाने तरतूद पाच कोटी रुपये केली होती परंतु काटकसर करून खर्च आवाक्यात ठेवल्याची माहिती आयुक्तांनी दिली. खर्चाची पडताळणी करण्याऱ्या कर्मचा-यांची बुधवारी आयुक्तांनी बैठक घेतली.
२०१३ मध्ये झालेल्या मनपा सार्वत्रिक निवडणुकीचा खर्च दोन कोटी रुपये होता. प्रशासनाने यावर्षी खर्चात काटकसर केली. अद्याप खर्चाचा आढावा घेण्याचे काम सुरू असले तरीही हा खर्च पावणेदोन कोटी रुपयांपर्यंतच मर्यादित राहील, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
महापालिकेत उपायुक्त व कॅफो यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला आहे. ही दोन्ही पदे डेप्युटेशनवर भरली जाणार असल्याने त्याला मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजुरी लागणार आहे. १०० कोटी रुपयांतून करायच्या कामांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाºया महासभेत त्यांना मंजुरी घेतली जाईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
मतदान खर्च सादर करण्याचे काम जवळपास पूर्ण झाल्याने यासाठी नियुक्त कर्मचाºयांना त्यांच्या मुळ जबाबदारीच्या टेबलावर काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.