शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

हगणदरीमुक्तीत जळगाव मनपा ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 12:11 IST

‘परीक्षा’पूर्वीचा निकाल : उघडय़ावर बसणे सुरुच, गुडमॉर्निग पथके नावालाच

ठळक मुद्देउपाययोजना आवश्यकहगणदरीमुक्तीचा दावा फोल इशा:यानंतरही हगणदरी कायम

ऑनलाईन लोकमत / चंद्रशेखर जोशी

जळगाव, दि. 3 -   स्वच्छ भारत अभियानांतर्गत उघडय़ावर शौचास बसण्याची 58 पैकी सर्व ठिकाणे हगणदरीमुक्त झाली असून राज्याच्या समितीने परीक्षेसाठी केव्हाही शहरात यावे म्हणून महापालिकेने राज्य शासनाला पत्र दिले आहे. मात्र महापालिका प्रशासनाचा हा दावा कागदोपत्रीच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.   नेहमीची ठिकाणे सोडून पर्यायी ठिकाणांवर गरीब वस्त्यांमधील नागरिक शौचास बसत असल्याचे या पाहणीत दिसल्याने परीक्षेपूर्वीच मनपा प्रशासन नापास झाले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. स्वच्छ भारत अभियानाचा सर्वत्र गाजावाजा सुरू आहे. या पाश्र्वभूमीवरच राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या समितीतील अधिका:यांनी दोन वेळा शहरास भेट देऊन मनपा आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत होत असलेल्या कामांविषयी नाराजी व्यक्त करून कडक समज दिली होती. 31 ऑगस्टपूर्वी काहीही करून  शहर हगणदरीमुक्त करा अन्यथा महापालिकेला मिळणारे सर्व शासकीय अनुदान बंद होईल असा इशारा या समितीचे प्रमुख तथा नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी दिला होता. त्यानंतर आरोग्य विभागात काही कर्मचा:यांच्या बदल्या करण्यात आल्या मात्र त्यानंतरही शहरात हगणदरी कायम आहे.

शहर हगणदरीमुक्त झाले की नाही? याबाबत ‘लोकमत’ चमूने शनिवारी सकाळी जुना असोदा रोड, याच परिसरातील मोहन टॉकीज समोरील मोकळी जागा, गुरूदत्त कॉलनी समोरील जागा, गोपाळपूरा येथील सार्वजनिक शौचालय, पांझरापोळ टाकी जवळील शौचालये, शिरसोली नाका पारख संकुलाच्या मागील भाग, समता नगरकडून कोल्हे हिल्सकडे जाणा:या रस्त्यावरील उंच भाग, शिवाजी उद्यानाकडून  मेहरूणकडच्या खदाणीकडील भागांना भेट दिली असता महापालिका प्रशासनाकडून केला जात असलेला हगणदरीमुक्तीचा दावा फोल ठरत असल्याचे दिसून आले. 

अशी आढळून आली परिस्थितीजुना असोदा रोड मोहन टॉकीज जवळील मोकळ्या जागेत महिला दिवसादेखील शौचास जात असल्याचे दिसून आले. गुरूदत्त कॉलनीसमोरील मोकळ्या जागेतही रात्री नागरिक शौचास जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या. गोपाळपुरा भागात शौचालयाच्या पाण्याच्या कुंडाला गळती लागलेली होती. दरवाज्याला कडी कोयंडा नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. पांझरापोळ टाकी जवळ नागरिक उघडय़ावर बसणे बंद झाले मात्र तेथील शौचालयाची दुरवस्था असल्याचे दिसून आले. महिलांचे 24 शौचकूप बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. शिरसोली नाका पारख संकुलाच्या मागील भागात रात्री नागरिक शौचास बसत असल्याचे लक्षात आले. समतानगरकडे कोल्हे हिल्सकडे जाणा:या रस्त्यावर नागरिक शौचास बसत नाहीत मात्र समता नगरमागील डोंगर तसेच रस्त्याच्या दक्षिणेस असलेल्या उताराच्या जागेत नागरिक शौचास बसतात. तसेच सुरत रेल्वे गेट परिसरातील नाला, मोकळ्या जागा व शेतांमध्ये पुरुष व महिला शौचास बसतात. रेल्वेच्या मालधक्क्यावरही शौचविधी नागरिक करतात.हगणदरीमुक्तीसाठी नियुक्त यंत्रणा अधिक सक्रीय करण्याची गरज आहे. काही काळ दिवसादेखील कर्मचारी असावेत. हगणदरीच्या पर्यायी जागांवरही लक्ष ठेवले जाणे गरजेचे असून सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती व सफाईची कामे नियमित होणेही गरजेचे आहे. 

काही सार्वजनिक शौचालयांच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. नव्या ठिकाणांवरही गुडमॉर्निग पथके जातील अशी व्यवस्था करू. नागरिकांनीही जबाबदारी ओळखून उघडय़ावर शौचास बसू नये. -चंद्रकांत खोसे, उपायुक्त.