Jalgaon: हृदयद्रावक! बाथरूममध्ये गॅसची गळती, गुदमरून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 14:18 IST2022-11-21T14:17:19+5:302022-11-21T14:18:13+5:30
Jalgaon: बाथरूमच्या गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे १६ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना एरंडोल येथील रेणुका नगरात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

Jalgaon: हृदयद्रावक! बाथरूममध्ये गॅसची गळती, गुदमरून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू
- बी.एस.चौधरी
जळगाव - बाथरूमच्या गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे १६ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना एरंडोल येथील रेणुका नगरात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. यश (साई) वासुदेव पाटील असे या मुलाचे नाव आहे, तो रा.ती काबरे विद्यालयात दहावीत शिकत होता. त्याचे वडील व्ही. टी. पाटील हे त्याच शाळेत शिक्षक आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
साई हा अंघोळीसाठी गेला होता. बराच वेळ होवूनही तो बाहेर न आल्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटली. त्यांनी दरवाजा ठोठावला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.
यावेळी आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. हे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले असता नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. शिवसेना(ठाकरे ) पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पुंडलिक पाटील यांचा तो पुतण्या होत.