शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Jalgaon Election Results : भाजपाचा विकासाचा मुद्दा ठरला प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:27 IST

सुरेशदादा जैन यांना धक्का

ठळक मुद्देआयात उमेदवारांचे मिळाले बळ ..आता महाजन यांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवावा

हितेंद्र काळुंखेजळगाव : मनपा निवडणुकीत भाजपाने संयमी प्रचार करीत जळगावकरांना विकासाचे आश्वासन दिले. त्यामुळे शहरवासीयांनी शिवसेनेला नाकाराले व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या ३५ वर्षात मतदारांनी प्रथमच हादरा दिला.याविरुद्ध विकासाचे आश्वासन स्विकारुन भाजपाला भरघोस कौल देत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.गेली ३५ वर्षे जळगावच्या पालिका तसेच महापलिकेत सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. याच काळात आमदार म्हणूनही त्यांचे वर्चस्व होते. आमदारकी गमावल्यानंतर ही मनपा निवडणूक त्यांच्यासाठी राजकीय अस्तीत्वाची लढाई होती. तर गिरीश महाजन यांच्या भाजपाच्या जिल्ह्यातील नेतृत्वाला झळाळी देणारी होती.मनपातील सत्ताधाऱ्यांवरील नाराजीचा झाला फायदामनपावर हुडको व इतर कर्जाचा डोंगर असल्याने उत्पन्नातील बहुतांश वाटा हा कर्ज फेडण्यातच जात होता. यामुळे विकास कामांसाठी पैसाच शिल्लक राहत नसल्याने गेल्या अनेक वर्षात विकास कामेच होवू शकली नाही. याचबरोबर मनपातील सत्ताधाºयांवर गैरव्यवहाराचा ठपका बसला. ही कारणे मतदारांमध्ये सत्ताधारी खाविआ (शिवसेना) बद्दल नाराजी निर्माण करणारी ठरली. या नाराज मतदारांना विकासाचे आश्वासन देत आपल्याकडे वळविण्यात भाजपाने यश मिळवले.विकास न केल्यास ‘विधानसभे’त मते न मागण्याचा दिलाय शब्दमनपाला कर्जकमुक्त करु, विकासासाठी २ महिन्यातच २०० कोटी आणू आदी आश्वासने महाजन यांनी मतदारांना दिली. ही आश्वासने १ वर्षात पूर्ण नाही झालीत तर विधानसभेत मत मागणार नाही, असे म्हणत आमदार सुरेश भोळे यांना कसोटीवर लावले होते. हाच मुद्दा मतदारांना अपील करणारा ठरला. फक्त विकास करु असे म्हटले असते तर मतदारांनी कदाचित विश्वास टाकला नसता...आता महाजन यांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवावानगरपालिका आणि मनपाच्या इतिहासात भाजपाला जळगावकरांनी प्रथमच मनपावर एकहाती सत्ता देवून विश्वास टाकला आहे. यामुळे भाजपाचा हा ऐतिहासिकच विजय ठरतो. विकास करु या आश्वासनावर विश्वास ठेवत मतदारांनी भाजपाला कौल दिला. यामुळे १ वर्षात विकास करुन दाखवू , एकदा संधी देवून बघा.... असे म्हणणारे गिरीश महाजन यांना मतदारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी आता निभवावी लागणार आहे.

आयात उमेदवारांचे मिळाले बळ निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने मनसे, शिवसेना तसेच राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात प्रबळ उमेदवार आयात केले. याचाही लाभ भाजपाल झाला. स्वपक्षाचे १५ नगरसेवक होते. यापैकी १३ जणांना उमेदवारी देण्यात आली तर आयात उमेदवारांवर मदार ठेवत खाविआचे ३, राष्ट्रवादीचे ६ तर मनसेचे महापौर ललित कोल्हे यांच्यासह ६ व १ जनक्रांतीचा अशा एकूण १६ आयात केलेल्या नगरसेवकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना भाजपाने उमेदवारी दिली. शिवसनेसोबत असलेले मनसेचे महापौर व त्यांचे ८ नगरसेवक ऐन निवडणूकीत भाजपात शिरल्याने शिवसेनेला हा मोठा फटका बसला. महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतर नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यात भाजपाची राज्यातील ‘सत्ता’ हेच प्रभावी अस्त्र ठरले. 

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकJalgaonजळगाव