हॉटेल्सना रिव्ह्यू देण्याचा टास्क अन् खात्यात जमा व्हायचे पैसे; अनोळख्या मैत्रिणीने डॉक्टरला २८ लाखांना गंडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:39 IST2025-11-05T15:38:05+5:302025-11-05T15:39:04+5:30

जळगावात एका डॉक्टरची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jalgaon Doctor loses Rs 28 lakh in review task lure | हॉटेल्सना रिव्ह्यू देण्याचा टास्क अन् खात्यात जमा व्हायचे पैसे; अनोळख्या मैत्रिणीने डॉक्टरला २८ लाखांना गंडवले

हॉटेल्सना रिव्ह्यू देण्याचा टास्क अन् खात्यात जमा व्हायचे पैसे; अनोळख्या मैत्रिणीने डॉक्टरला २८ लाखांना गंडवले

Jalgaon Crime: जळगावात ऑनलाइन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरची फसवणूक करण्यात आली. फेसबुकवरून ओळख वाढवून एका सायबर गुन्हेगाराने अमळनेर येथील एका डॉक्टरची तब्बल २७ लाख ९५ हजार ६३० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी डॉक्टरांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

अमळनेर येथील ४८ वर्षीय डॉक्टर हे फेसबुकवर नियमित सक्रिय असतात. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांना अंकिता देसाई नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली, जी त्यांनी स्वीकारली. या महिलेने डॉक्टरांना ट्रस्ट बुकिंग कस्टमर सर्व्हिस नावाची एक कंपनी असून, त्यात पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले. अंकिता देसाईने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामद्वारे डॉक्टरांना संपर्क साधला. तिने त्यांना एक लिंक पाठवून त्यावर माहिती भरण्यास सांगितले. सुरुवातीला १० हजार रुपये गुंतवून वेबसाईट्स आणि हॉटेल्सना ५ स्टार रिव्ह्यू देण्याचा टास्क दिला. प्रत्येक टास्क पूर्ण झाल्यावर भरलेल्या रकमेवर ०.२५ टक्के नफा मिळेल, असे सांगण्यात आले होते.

विश्वास संपादन करून मोठी फसवणूक 

९ ऑक्टोबर रोजी डॉक्टरांनी त्यांच्या बँक खात्यातून १० हजार रुपये पाठवले. त्यानंतर त्यांना अॅपमध्ये ९०० रुपयांचा नफा दिसला, ज्यामुळे डॉक्टरचा विश्वास बसला. यानंतर वारंवार टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली  वेगवेगळ्या बँक खात्यांवर डॉक्टरने वेळोवेळी एकूण २७ लाख ९५ हजार ६३० रुपये भरले. अॅपमध्ये त्यांना ३६ लाख ८२ हजार २७५ रुपये नफा झाल्याचे दिसत होते.

पैसे काढण्याचा प्रयत्न फसल्याने डॉक्टरांना संशय 

जेव्हा डॉक्टरांनी भरलेली मूळ रक्कम आणि झालेला नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते शक्य झाले नाही. त्यांनी अंकिता देसाईशी संपर्क साधला असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आणखी पैशांची मागणी करू लागली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी २९ ऑक्टोबर रोजी सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली आहे.

Web Title : होटल रिव्यू के काम में डॉक्टर को ऑनलाइन दोस्ती से 28 लाख का चूना।

Web Summary : अमरावती के एक डॉक्टर को फेसबुक पर हुई दोस्ती के बाद होटल रिव्यू स्कीम में निवेश करने के लालच में 28 लाख रुपये का नुकसान हुआ। धोखेबाज ने पहले छोटे मुनाफे देकर विश्वास जीता, फिर निकासी रोक दी और अधिक पैसे की मांग की, जिसके बाद पुलिस में शिकायत दर्ज कराई गई।

Web Title : Online friendship scams doctor; loses ₹28 lakh in hotel review task.

Web Summary : A doctor from Amravati lost ₹28 lakh after being lured by a Facebook friend into investing in a fake hotel review scheme. The scammer gained trust by initially paying small profits, then blocked withdrawals and demanded more money, prompting a police complaint.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.