विहिरीत फेकण्याची धमकी देत जळगाव जिल्ह्यात बारा वर्षाच्या मुलावर दोघांकडून अनैसर्गिक कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 18:52 IST2018-03-25T18:52:35+5:302018-03-25T18:52:35+5:30

शेतात बक-या चारण्यासाठी गेलेल्या बारा वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकण्याची धमकी देत दोघांनी त्याच्यावर अनैसर्गिककृत्य (अत्याचार) केल्याचा किळसवाणा प्रकार तालुक्यातील लोणवाडी तांडा येथे उघडकीस आला आहे. संतोष बाबु चव्हाण (वय ३८) व भंगू रायसिंग चव्हाण (वय ३०) या दोघं नराधमांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. 

Irregular act of two children in Jalgaon district, threatening to throw in well | विहिरीत फेकण्याची धमकी देत जळगाव जिल्ह्यात बारा वर्षाच्या मुलावर दोघांकडून अनैसर्गिक कृत्य

विहिरीत फेकण्याची धमकी देत जळगाव जिल्ह्यात बारा वर्षाच्या मुलावर दोघांकडून अनैसर्गिक कृत्य

ठळक मुद्दे  जबरदस्तीने गावठी दारुही पाजली पोट दुखीमुळे फुटले बींगदोघांना अटक

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २५ : शेतात बक-या चारण्यासाठी गेलेल्या बारा वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकण्याची धमकी देत दोघांनी त्याच्यावर अनैसर्गिककृत्य (अत्याचार) केल्याचा किळसवाणा प्रकार तालुक्यातील लोणवाडी तांडा येथे उघडकीस आला आहे. संतोष बाबु चव्हाण (वय ३८) व भंगू रायसिंग चव्हाण (वय ३०) या दोघं नराधमांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. 
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील लोणवाडी तांडा येथील सागर (नाव बदलले आहे) हा गावापासून जवळच असलेल्या बांबरुड राणीचे, ता.पाचोरा येथील शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने वडीलांनी त्याला सहा महिन्यापासून घरीच थांबविले आहे. त्यामुळे दररोज सकाळी ८ वाजता घरच्या बक-या चारण्यासाठी जंगलात जातो. दुपारी बारा वाजता घरी आल्यावर पुन्हा दुपारी तो बक-या चारण्यासाठी जातो नंतर सायंकाळी सहा वाजताच परत येतो. जंगलात असताना गावातीलच संतोष बाबु चव्हाण व भंगू रायसिंग चव्हाण या दोघांनी सागर याच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. २४ फेब्रुवारी ते २४ मार्च या एक महिन्याच्या कालावधीत या दोघांनी ओंकार राजाराम चव्हाण यांच्या केळीच्या बागेत सागर याच्यावर ४ ते ५ वेळा अत्याचार केला. 

Web Title: Irregular act of two children in Jalgaon district, threatening to throw in well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.