शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकाअभावी अपघाताला निमंत्रण

By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST

शहरातील मोठा मारुती मंदिर आणि संजय टाऊन हॉल चौकात गतिरोधक नसल्याने भरधाव वेगातील वाहनधारकांमुळे अपघात होत आहेत. यासाठी येथे गतिरोधक बसविण्याची आवश्यकता आहे.

नंदुरबार : शहरातील मोठा मारुती मंदिर आणि संजय टाऊन हॉल चौकात गतिरोधक नसल्याने भरधाव वेगातील वाहनधारकांमुळे अपघात होत आहेत. यासाठी येथे गतिरोधक बसविण्याची आवश्यकता आहे.श्रॉफ हायस्कूलसमोर धुळे रस्त्याकडून, नाट्यमंदिराकडून, सोनी विहीरमार्गे, तसेच शासकीय विश्रामगृहाकडून येणारी वाहने संजय टाऊन हॉलच्या चौकात येतात. मात्र याठिकाणी संजय टाऊन हॉलच्या संरक्षक भिंतीलगत मोठय़ा प्रमाणावर गुलाबी फुलांची झाडे आहेत. या झाडांच्या फांद्या वाढलेल्या असून, या फांद्यांमुळे भरधाव वेगात येणारी वाहने एकमेकांना नजरेस पडत नाहीत. तसेच मोठा मारुती मंदिर ते सोनी विहीरदरम्यान गतिरोधक नसल्याने महाविद्यालयीन युवक, शालेय विद्यार्थी सुसाट वाहने चालवितात. तसेच याच ठिकाणी वळणावर तीनचाकी, चारचाकी, वाहनांनादेखील अडचण येत असते.संजय टाऊन हॉल चौकात सध्या चौपाटीप्रमाणे अनेक हातगाड्या लागल्या असून अनेक वाहनधारक रस्त्यावर वाहने थांबवून नाश्त्याचा आस्वाद घेतात. याशिवाय शाळा सुटल्यानंतर याठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. पायी चालणार्‍यांसह सायकल, रिक्षा, दुचाकी, बसेस, ट्रक याच मार्गावरून ये-जा करतात.त्यामुळे संजय टाऊन हॉल आणि मोठा मारुती मंदिराजवळ गतिरोधक बसविण्यात यावे, तसेच रस्ता मोकळा करण्याची मागणी होत आहे. अत्यंत वर्दळीच्या या चौकात शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त करण्याची आवश्यकता आहे. अनेक वेळा सकाळी व सायंकाळी, रात्री फिरण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना भरधाव वेगातील वाहनधारकांची भीती असते. नंदुरबार येथे मोठा मारुती मंदिरासमोरून जळका बाजाराकडे जाणार्‍या तीव्र उताराच्या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहनधारक बेफामपणे वाहने चालवित असल्याचा सर्वसाधारण अनुभव आहे.