शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या गुन्ह्यांचा तपासच लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:22 PM

:जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेले भादली हत्याकांड, दीड वर्षापूर्वी ५५ लाखाची बॅग लंपास व आताची २० लाखाची बॅग लांबविण्याची घटना असो की जिल्ह्यातील एटीएम फोडण्याच्या घटना, त्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. अनेक लहान मोठ्या चोºया, जबरी चोºया व घरफोडीची गुन्हे उघडकीस येत असताना या मोठ्या गुन्ह्यांचा तपास का लागत नाही. यंत्रणा नेमकी कुठे कमी पडते. मोठे गुन्हे उघडकीस आणणे हे यंत्रणेसमोर एक आव्हान असते. 

ठळक मुद्देक्राईम वार्तापत्र यंत्रणा ठरतेय कुचकामीतंत्रज्ञानावर आधारीत तपासावर भर

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ :जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेले भादली हत्याकांड, दीड वर्षापूर्वी ५५ लाखाची बॅग लंपास व आताची २० लाखाची बॅग लांबविण्याची घटना असो की जिल्ह्यातील एटीएम फोडण्याच्या घटना, त्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. अनेक लहान मोठ्या चोºया, जबरी चोºया व घरफोडीची गुन्हे उघडकीस येत असताना या मोठ्या गुन्ह्यांचा तपास का लागत नाही. यंत्रणा नेमकी कुठे कमी पडते. मोठे गुन्हे उघडकीस आणणे हे यंत्रणेसमोर एक आव्हान असते. दीड वर्षापूर्वी जामनेर येथील एका व्यापाºयाने काव्यरत्नावली चौकातून ५५ लाख रुपये काढले होते. ही रक्कम कारमध्ये घेऊन जात असताना टायर पंक्चर झाल्याचे सांगून चोरट्यांनी चालकाचे लक्ष विचलित केले होते. त्यानंतर अजिंठा चौक परिसरात गॅरेजवर कार थांबली असता तेथून काच फोडून ही बॅग लांबविण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परराज्यात जाऊन आले, मात्र चोरटे हाती लागले नाही. काही दिवसापूर्वीच धनाजी नाना चौधरी आदिवासी मंडळ संचलित सत्रासेन आश्रमशाळेच्या (ता.चोपडा) कामाचे २० लाख रुपये संस्थेचे संचालक रवींद्र रायसिंग भादले यांनी स्टेट बँकेतून काढले. रस्त्यात नोटा टाकून चालकाचे तर बॅँकेत साहेबांनी बोलावल्याचे सांगून मालकाचे लक्ष विचलित करुन ही रक्कम लांबविण्यात आली. या घटनेतील चोरटे देखील परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात स्पष्टपणे दिसत असतानाही ते पोलिसांच्या हाती लागू शकत नाही, ही खेदाची बाब आहे.    नाही. दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यात एटीएम फोडणारी टोळी सक्रीय झाली होती. या टोळीने जिल्ह्यातील अनेक एटीएमधून लाखो रुपये लांबविले. या सर्व घटनांची पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झाली, तपासाचा भाग म्हणून ती प्रक्रियाही झाली, मात्र आजतायगत कोणत्याच गुन्ह्यातील आरोपी मिळून आलेला नाही. काही वर्षापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयसमोर एटीएम फोडून ९२ लाखाची रोकड लांबविण्यात आली होती. या घटनेचाही तपास लागलेला नाही. जेव्हा मोठी घटना घडते, तेव्हा मागील घटनांच्या आठवणी आपोआप ताज्या होतात. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान नव्हते, खबºया व पोलिसांचे संपर्काचे जाळे यावरच गुन्ह्यांचा तपास लागत होता. आता मोबाईल सीडीआर असो की सीसीटीव्ही कॅमेरे यासारखे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यावरही  तपास लागत नाही. या तंत्रज्ञानामुळे मनापासून काम करण्याची मानसिकता कोणाचीच राहिलेली नाही. तंत्रज्ञानाच्या आधारावर जी माहिती मिळेल त्यावरच तपास अवलंबून राहू लागला आहे. त्यामुळे तंत्रज्ञान देशासाठी फायद्याचे ठरु लागले आहे, तितकेच काही प्रकरणात घातकही ठरु लागल्याचे वास्तव आहे. तपासी यंत्रणांनी अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले तर नक्कीच त्यात त्यांना यश येईल. हे अनेक प्रकरणातून सिध्दही झालेले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा