Introduction of 3 youths at the Maui Foundation Fair | मौय फाऊंडेशन मेळाव्यात ६५ युवक-युवतींचा परिचय
मौय फाऊंडेशन मेळाव्यात ६५ युवक-युवतींचा परिचय

जळगाव : मौर्य युवा फाऊंडेशनतर्फे आयोजित परिचय मेळाव्यात ६५ युवक-युवतींनी परिचय करुन दिला़ यात ३५ युवक व ३० युवतींचा सहभाग होता़ यावेळी समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती़
हतनूर सभागृहात फाऊंडेशनतफे सलग दुसऱ्या वर्षी हा मेळावा झाला़ यावेळी आमदार सुरेश भोळे, आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक मुराई, नगरसेविका सुरेशा तायडे, ज्योती चव्हाण, फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवनारायण मौर्य, उपाध्यक्ष श्याम बहादूर मौर्य, सचिव रामनरेश मौर्य, खजिनदार सूर्यपाल मौर्य, कार्याध्यक्ष डिगंबर परदेशी, सह उपाध्यक्ष मनिष मौर्य, परशुराम मौर्य, रमेश कुशावल, अजय मौर्य, रूपेश मौर्य, लखूबाई मौर्य, शिवकुमारी मौर्य, शकुंतला मौर्य, मिठाबाई मौर्य, गोविंदकुमारी मौर्य आदींसह भुसावळ, खंडवा, अमरावती, अकोला या ठिकाणच्या समाजाचे अध्यक्ष उपस्थित होते़
मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले़

Web Title: Introduction of 3 youths at the Maui Foundation Fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.