कारचे टार फुटून दुचाकीवर धडकल्याने तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 15:56 IST2019-01-01T15:56:03+5:302019-01-01T15:56:27+5:30

खेडगावनजीक अपघात

 The injured youth wounded by a motorcycle breaking a bike | कारचे टार फुटून दुचाकीवर धडकल्याने तरुण जखमी

कारचे टार फुटून दुचाकीवर धडकल्याने तरुण जखमी

सामनेर, ता.पाचोरा : कारचे टायर फुटून ती दुचाकीवर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नगराज पाटील (वय ३०, रा. खेडगाव नंदीचे) हे जखमी झाले. हा अपघात खेडगावनजीक झाला. जखमीला पाचोरा येथील प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी तत्काळ मदत करीत रुग्णालयात हलविले.
खेडगाव नंदीचे येथील नगराज पाटील हे पाचोरा जात असताना समोरून येणाऱ्या कारचे टायर फुटून ती नगराज पाटील यांच्या दुचाकील्या धडकली. यात पाटील हे खाली कोसळले व त्यांना दुखापत झाली. अपघातानंतर वाहतुकीवरही परिणाम झाला. त्या वेळी जळगावकडून येत असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांनी तत्काळ जखमीला उपचारार्थ पाचोरा येथे रुग्णालयात हलविले. सोबतच घटनास्थळी थांबून वाहतूक सुरळीत केली.

Web Title:  The injured youth wounded by a motorcycle breaking a bike