अमळनेरमध्ये भारत केसरी-महाराष्ट्र केसरीत महकुस्ती रंगणार; अडीच लाखाचा इनाम कोण जिंकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 21:48 IST2022-10-23T21:48:24+5:302022-10-23T21:48:54+5:30
भारत मदने व बाला रफिक यांच्या लढतीसाठी अडीच लाखांचा इनाम ठेवण्यात आला आहे.

अमळनेरमध्ये भारत केसरी-महाराष्ट्र केसरीत महकुस्ती रंगणार; अडीच लाखाचा इनाम कोण जिंकणार?
अमळनेर: अनेक वर्षांनंतर अमळनेर शहरात खड्डा जीनच्या मैदानावर ७ नोव्हेंबर रोजी महान भारत केसरी पैलवान भारत मदने(बारामती) व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक (सोलापूर) यांच्यात महाकुस्तीचा सामना रंगणार आहे. यासाठी अमळनेर तालीम संघाने जय्यत तयारी सुरू केली आहे.
एकेकाळी अमळनेरातील जपान जीन ,तंबोली जीन ,खड्डा जीन मध्ये कुस्त्यांच्या दंगली गाजत होत्या. अमळनेरातून अनेक नामवंत पैलवान होऊन गेले आहेत. अमळनेर तालीम संघाने पुन्हा कुस्ती खेळाला प्राधान्य देऊन तरुणांमध्ये कुस्तीची आवड निर्माण व्हावी म्हणून ७ नोव्हेंबर रोजी मोठमोठ्या पैलवानांच्या कुस्तीच्या लढती आयोजित केल्या आहेत. भारत मदने व बाला रफिक यांच्या लढतीसाठी अडीच लाखांचा इनाम ठेवण्यात आला आहे.
यासह बबलू पैलवान चाळीसगाव व शाकिरनुर पैलवान मेरठ , हितेश पाटील पाचोरा व सैफअली पंजाबी मालेगाव , निजामअली अमळनेर व करण देवरे चाळीसगाव , सोपान माळी चाळीसगाव व शादाब पैलवान भुसावळ , पवन शिंपी अमळनेर व अज्जू पैलवान कासोदा , मोईनअली अहमदनगर व सोनू पैलवान अमळनेर ,अमन पैलवान भुसावळ व योगराज चौधरी अमळनेर , ऋषिकेश पाटील अमळनेर व समाधान पाटील तरवाडे , फरहान पैलवान रावेर व बंटी शिंदे जळगाव यांच्यातही कुस्तीचे सामने रंगणार आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमळनेर तालीम संघाचे शब्बीर पैलवान ,माजी नगरसेवक संजय पाटील(भूत बापू), संजय भिला पाटील , माजी नगरसेवक प्रताप शिंपी , महाराष्ट्र चॅम्पियन रावसाहेब पाटील , विनोद निकम , तालुका कुस्तीगीर संघाचे बाळू पाटील ,भरत पवार परिश्रम घेत आहेत. या कुस्त्यांच्या महादंगलीसाठी पंच म्हणून जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख , मल्लविद्या कुस्तीगीर अध्यक्ष आण्णा कोळी , आदिल पैलवान , राजू पाटील काम पाहणार आहेत.