रुग्णाची तपासणी करण्यासाठी येणारे डॉक्टर बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 21:10 IST2020-03-25T21:10:03+5:302020-03-25T21:10:15+5:30
कार उलटली : काच उघडून निघाले बाहेर

रुग्णाची तपासणी करण्यासाठी येणारे डॉक्टर बचावले
जळगाव : एका लहान मुलांच्या दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी येत असलेल्या डॉक्टरची कार अग्रवाल चौकानजीकच्या रस्त्यावरील नाल्याकाठीच उलटल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता घडली. नशिब बलत्तर म्हणून डॉक्टरांना जराही खरचटले नाहीत. नाल्यात पलटी होण्यापासून कारही बचावली आहे. दरवाजाची काच उघडून डॉक्टर बाहेर निघाले.
जिल्हा रुग्णालयाचे माजी निवासी वैद्यकिय अधिकारी असलेले डॉ. विनोद बाविस्कर हे बुधवारी दुपारी अग्रवाल चौक परिसरात एका दवाखान्यात दाखल असलेल्या लहान मुलाच्या तपासणीसाठी जात होते, तेव्हा कच्च्या रस्त्यावरील नाल्याचा ढाबा घसरल्याने कार (क्र.एम.एच.१९ बी.जे.०४०५) तेथे उलटी झाली. सुुदैवाने कार नाल्यात गेली नाही. नाल्याच्या कडेलाच कार अडकल्याने डॉ.बाविस्कर हे दरवाजाचा काच उघडून बाहेर आले. नंतर लोकांनी कार सरळ केली. यात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे.