पहूर गावाला पोखरा योजनेत समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:16 IST2021-07-31T04:16:50+5:302021-07-31T04:16:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पहूर, ता. जामनेर : पहूरपेठ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पहूर पेठ, खर्चाने व सांगवी गावातील नागरिकांचा ...

पहूर गावाला पोखरा योजनेत समाविष्ट करा
लोकमत न्यूज नेटवर्क
पहूर, ता. जामनेर : पहूरपेठ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पहूर पेठ, खर्चाने व सांगवी गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने या गावांना महाराष्ट्र शासनाच्या पोखरा योजनेत समाविष्ट करावे, अशा आशयाचे निवेदन पहूरपेठ ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा कृषी अधीक्षकांना देण्यात आले आहे.
शासनाच्या लोकाभिमुख योजनांंबरोबरच गावातील विकास कामांसाठी सरपंच नीता पाटील यांचा शासनस्तरावर पाठपुरावा केलेल्या अनेक कामांतून सुरू आहे. पोखरा योजनेसाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही. यामुळे शेती व्यवसायात नुकसान होत आहे. शासनाच्या पोखरा योजना अंतर्गत शेती साहित्य अनुदान तत्त्वावर शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र या योजनेचे लाभार्थी गाव असले तरी योजनेत समाविष्ट नाही. त्यामुळे शेतकरी पोखरा योजनेपासून वंचित राहत आहे. शेतकऱ्यांना शासनापासून योजनेत होणारा दुजाभाव दूर करून पहूर पेठ, सांगवी व खर्चाने गावांचा पोखरा योजनेत समावेश करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
पेठ ग्रामपंचायत सरपंच नीता रामेश्वर पाटील यांच्या स्वाक्षरीचे निवेदन उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीप्रमुख रामेश्वर पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिले आहे. याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन सादर केले.