शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

चाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:16 IST

अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालय देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही

ठळक मुद्देआनंदाचा क्षण जागा मिळाल्यानंतर न्यायालयाची इमारत व कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात येतील

चाळीसगाव : चाळीसगाव येथील वकील बांधवांसह न्यायदान क्षेत्राला सशक्त वारसा आहे. ज्या प्रमाणे वरिष्ठ स्तर न्यायालय देण्यासाठी प्रयत्न केला, त्याचप्रमाणे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी आवश्यक अटींची पूर्तता केल्यास यासाठीदेखील प्रयत्नशील राहिल, असे अश्वासित करुन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी न्यायदानाची प्रक्रिया जलद करण्यासाठी अवाहनही केले. रविवारी सकाळी न्यायमूर्ती गंगापूरवाला यांच्याहस्ते चाळीसगाव न्यायालयाच्या आवारात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व चाळीसगावचे भूमीपुत्र संगीतराव पाटील यांच्यासह जिल्हा न्यायाधीश गोविंदा सानप, चाळीसगावच्या नूतन वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश लक्ष्मीकांत पाढेन, चाळीसगाव वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी वकील संघासह, न्यायालयीन कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना न्यायमूर्ती गंगापुरवाला म्हणाले, वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन झाल्याने संधी वाढणार आहे. येथील पक्षकार आणि वकिलवृंदास होणारा त्रासही थांबणार आहे. अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन दिल्यास चाळीसगाव येथे ही देखील सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. त्यांनी मनोगतात न्यायदानाची प्रक्रिया गतीमान करण्यासह 'नो पेंन्डसी' हे तत्व पाळावे. अशी अपेक्षा व्यक्त केली.आनंदाचा क्षणचाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय सुरु होणे हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांनी व्यक्त केली. ३१ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर हे न्यायालय स्थापन होतेयं याचाही त्यांनी उल्लेख केला. उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींची पुर्तता झाल्यामुळे न्यायालय स्थापन होऊ शकले हे खरेच. परंतू यासाठी आमदार म्हणून उन्मेष पाटील यांनी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या फाईलीला 'धक्का' देण्याचे काम केले आहे. पुढील काळात अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी आपण पाठपुरावा सुरुच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हा न्यायाधीश गोविंदा सानप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जळगाव येथे दाखल असलेली एक हजार १५९ प्रकरणे आता चाळीसगाव येथे नव्याने सुरु झालेल्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात वर्ग झाली आहे. कृषि विभागाच्या ताब्यात असलेल्या गट क्र. २२२ एक व दोन मधील१० हेक्टर ८६ आर जागेपैकी न्यायालयासाठी तीन हेक्टर जागा मंजुर करावी. असा प्रस्ताव कृती समितीने बांधकाम विभागाकडे मार्च मध्ये दाखल केला आहे. जागा मिळाल्यानंतर न्यायालयाची इमारत व कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात येतील. यासाठी आर्थिक तरतूद करणे शक्य होणार आहे.प्रास्ताविकात अ‍ॅड. राहुल पाटील यांनी ३१ वषार्पासून सुरु असलेला पाठपुरावा विषद केला. यावेळी माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील, आमदार उन्मेष पाटील, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उदेसिंग पवार, प्रदीप देशमुख, प्रा. साहेबराव घोडे, उपसभापती संजय पाटील, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, जळगाव, पाचोरा, भुसावळ, भडगाव येथील वकील व सरकारी वकील व यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन चाळीसगाव न्यायालयाच्या न्यायाधीश अनिता गिरडकर यांनी केले. आभार जिल्हा न्यायाधीश लाडेकर यांनी मानले.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव