लोकसंघर्षच्या कोविड सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:16 AM2021-03-18T04:16:33+5:302021-03-18T04:16:33+5:30

जळगाव : लोकसंघर्ष मोर्चातर्फे शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ...

Inauguration of Kovid Center for People's Struggle | लोकसंघर्षच्या कोविड सेंटरचे उद्घाटन

लोकसंघर्षच्या कोविड सेंटरचे उद्घाटन

Next

जळगाव : लोकसंघर्ष मोर्चातर्फे शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते याचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चाचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून आकस्मिक परिस्थितीत माणुसकीची शिकवण देणारे आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगर पालिकेचे आयुक्त प्रदीप कुलकर्णी, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, माजी उपमहापौर करीम सालार, डॉ. स्नेहल फेगडे, अब्दुल गफ्फार मलिक, डॉ. क्षितिज पवार, डॉ. विजय घोलप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अनेक कोविड रुग्णांना निःशुल्क प्रवेश देण्यात आला. या कोव्हीड सेंटरमध्ये १२५ बेडची व्यवस्था असून रुग्णाच्या राहण्याची व्यवस्था, आरोग्यव्यवस्था, प्रोटीनयुक्त नाश्ता, चहा, भोजन तसेच आवश्यकत्यानुसार रुग्णवाहिका इत्यादी सेवा लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सचिन धांडे, विजय देसाई, योगेश पाटील, भारत कर्डीले, प्रमोद पाटील, दामोदर भारंबे, कैलास मोरे, उर्मिला पाटील आदी कार्यकर्ते कोरोना योद्धा बनून अथक परिश्रम घेत आहेत.

Web Title: Inauguration of Kovid Center for People's Struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.