जळगावमध्ये हातभट्टीवाल्यांना जोरदार हिसका; २७ जण अटकेत, २९ गुन्हे नोंद
By विजय.सैतवाल | Updated: August 20, 2023 16:24 IST2023-08-20T16:24:33+5:302023-08-20T16:24:58+5:30
दोन दिवसांच्या कारवाईनंतर १९ रोजी एकूण २९ गुन्हे दाखल करीत २७ आरोपींना अटक करण्यात आली.

जळगावमध्ये हातभट्टीवाल्यांना जोरदार हिसका; २७ जण अटकेत, २९ गुन्हे नोंद
जळगाव : दोन दिवसांच्या हातभट्टी निर्मिती ठिकाणी कारवाईनंतर १९ ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी विक्री व वाहतूक विरुद्ध मोहीम राबवून २९ गुन्हे दाखल करण्यासह दोन लाख चार हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस अधीक्षक एम. राजकुमार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा पोलिस दल आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने १७ आणि १८ ऑगस्ट रोजी गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्टीवर छापेमारी करून ९२ जणांना अटक करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला होता.
या दोन दिवसांच्या कारवाईनंतर १९ रोजी एकूण २९ गुन्हे दाखल करीत २७ आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी तीन हजार २० लिटर कच्चे रसायन, ७४० लिटर तयार गावठी दारू, ७४० लिटर देशी दारू, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.