कोळगाव-गुढे रस्त्यावर अवैध वृक्षतोडप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 22:27 IST2019-12-12T22:27:39+5:302019-12-12T22:27:43+5:30
लाकूड भरलेले वाहन जप्त : मात्र चोरटे पसार

कोळगाव-गुढे रस्त्यावर अवैध वृक्षतोडप्रकरणी गुन्हा
भडगाव : तालुक्यातील कोळगाव गुढे गावाच्या दरम्यान राज्य मार्ग क्र.२५ वरील दुतर्फा असलेल्या निंबाच्या झाडांपैकी एका बाजूच्या झाडाला कटर मशिन द्वारे कापून चोरीच्या उद्देशाने ट्रॅक्टर ट्रालीमध्ये टाकून घेऊन जाण्याच्या तयारीत असणा-या अज्ञाताविरुद्ध भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे विरेंद्र भरतसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राज्यमार्ग क्र.२५ कोळगाव गुढे गावाच्या पाटाच्या पुढे रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या एका निंबाच्या झाडाची कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी कटर मशीनने कटाई केली. दहा हजार रुपये किमतीचे लाकूड एका ट्रॅक्टर एमएच-४१ आआ-००६३ च्या विना नंबरच्या लाल रंगाच्या ट्रॉलीमध्ये टाकून चोरी करून नेले आहे. सदर चोरट्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर गुढे ग्रामस्थांनी पकडले असून चोरटे पळून गेले आहेत. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. सदर ट्रॅक्टर व ट्रॉली पोलिस स्टेशनला जमा केले आले.