अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:54 IST2019-12-20T11:53:27+5:302019-12-20T11:54:12+5:30
जळगाव : जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असली तरीही वाळू वाळू वाहतूक सुरूच असून गुरुवारी पुन्हा वाळू वाहतूक करणारे एक ...

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
जळगाव : जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असली तरीही वाळू वाळू वाहतूक सुरूच असून गुरुवारी पुन्हा वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.
तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर सावखेडा शिवारात नदी पात्रामध्ये पकडले. मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी डोभाळ, खेतमाळीस, प्रांत कार्यालयातील सावंत, पाटील यांनी ट्रॅक्टर पकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले.