शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाला दाखल करायचेय मग, आणा ५० हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सध्या दररोज ११०० च्या वर रुग्ण समोर येत आहेत. त्यातील बहुतेक रुग्णांना दवाखान्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात सध्या दररोज ११०० च्या वर रुग्ण समोर येत आहेत. त्यातील बहुतेक रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच खासगी रुग्णालये भरलेली असली तरी या रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्याच्या आधी नातेवाइकांना रुग्णालयात तब्बल ५० हजार रुपयांचा ॲडव्हान्स द्यावा लागत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण क्षमतेने रुग्ण दाखल आहेत. त्यासोबतच इतर शासकीय कोविड सेंटर आणि कोविड हॉस्पिटल्सदेखील पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे आता रुग्णांची बेड मिळण्यात ससेहोलपट होत आहे. त्यातच रुग्णाच्या नातेवाइकांना रुग्णाला दाखल करण्याच्या आधी तब्बल ५० हजार रुपये मोजावे लागत आहेत. शहरातील जवळपास सर्वच नामवंत रुग्णालयांमध्ये ५० हजार रुपये अग्रीम रक्कम आणि त्याशिवाय औषधांसाठी २० ते ३० हजार रुपये तयार ठेवा, असा सल्ला रुग्णाच्या नातेवाइकांना दिला जात आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हतबल झाले आहेत.

हॉस्पिटल क्रमांक १

‘लोकमत’ने शहरात महामार्गावर असलेल्या एका प्रसिद्ध रुग्णालयात विचारणा केली तेव्हा तेथे आधी रुग्णाला समोर घेऊन या, साधे बेड शिल्लक आहेत. मात्र, त्यांना दाखल करायचे की नाही हे डॉक्टरच ठरवतील. त्याच वेळी किती रक्कम जमा करायची हे सांगितले जाईल, असे सांगितले.

हॉस्पिटल क्रमांक २

त्याशेजारीच असलेल्या दुसऱ्या रुग्णालयात मात्र बेड आहेत. रुग्णाला दाखल करण्याच्या आधी ५० हजार रुपये अग्रीम रक्कम द्यावी लागेल, असे सांगण्यात आले.

हॉस्पिटल क्रमांक ३

बी.जे. मार्केटजवळील प्रसिद्ध असलेल्या रुग्णालयात औषधशास्त्र पदव्युत्तर असलेल्या डॉक्टरांनी आधी रुग्णाची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर ॲडव्हान्सबाबत विचारणा केली असता प्रशासन विभागातील सहकाऱ्यांनाच विचारण्याचा सल्ला दिला. प्रशासन विभागात चौकशी केली, तर त्यांनीदेखील रुग्णाला दाखल करताना ५० हजार रुपये आणि नंतर औषधांसाठी २० ते ३० हजार रुपये लागतील एवढी तयारी ठेवा, असा सल्ला दिला.

हॉस्पिटल क्रमांक ४

शाहूनगरजवळ असलेल्या एका नामांकित रुग्णालयात ‘लोकमत’ने चौकशी केली तेव्हा बऱ्याच वेळाने बेड थोड्या वेळात उपलब्ध होईल; पण त्यासाठी आधी येथे रुग्णालयात घेऊन या. मग दाखल करू. काही रुग्णांना घरी सोडले जाणार आहे. त्याच वेळी आलात तर बेड मिळू शकतो. ॲडव्हान्स हा ५० हजार रुपये लागेल, असे सांगण्यात आले.

हॉस्पिटल क्रमांक ५

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या कोविड रुग्णालयात विचारणा केली असता. रुग्णाला आधी घेऊन या, सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत डॉक्टर तपासणी करतील. मगच ठरवले जाईल की, रुग्णाला दाखल करायचे की नाही, असे सांगण्यात आले.

गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांचे हाल

गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना दाखल करताना ॲडव्हान्सची रक्कम मागितली जात असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अचानक ताप आल्यावर रुग्ण किंवा त्याच्या नातेवाइकांनादेखील पैसे आणताना अडचणी येत आहेत.