शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू न झाल्यास लोकवर्गणीतून निधी उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या संथ कामामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या संथ कामामुळे या भागातील नागरिक वैतागले आहेत. आता सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणने १५ ऑगस्टपर्यंत विद्युत खांबाचा अडथळा दूर करून, कामाला सुरुवात केली नाही. तर प्रत्येक नागरिकाकडे जाऊन पैसे जमा करून, विद्युत खांब हे लोकवर्गणीतून उभारलेल्या निधीतून हटविण्यात येतील, असा इशारा शिवाजीनगर भागातील नगरसेवकांनी दिला आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या लांबत जाणाऱ्या कामामुळे आता नागरिकांचा संयम सुटू लागत आहे. तब्बल अडीच वर्षांपासून नागरिक त्रास सहन करत आहेत. तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा मात्र या कामाकडे लक्ष देताना दिसून येत नाही. त्यामुळे शिवाजीनगर भागातील आठ नगरसेवकांनी शुक्रवारी बैठक घेऊन जर महावितरणने १५ ऑगस्टपर्यंत विद्युत खांब हटविले नाही तसेच बांधकाम विभागानेदेखील उर्वरित कामाला सुरुवात केली नाही तर या कामासाठी सर्व नगरसेवक हे या भागातील नागरिकांकडे जाऊन, या कामासाठी निधी उभारून महावितरणला देतील, अशी भूमिका आता नगरसेवकांनी घेतली असल्याची माहिती नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी दिली.

‘तो’ निधी वर्ग करण्यास पुन्हा आले विघ्न

१. विभागीय आयुक्तांनी विद्युत खांब हटविण्यासाठी दीड कोटी रुपयांचा मनपाने पाठविलेला प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर हा प्रस्ताव मनपाने आता राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास उशीर होऊ शकतो व त्यामुळे कामालादेखील उशीर होईल. यासाठी मनपा प्रशासनाने महावितरणला आपल्या फंडातून दीड कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शविली होती.

२. हा निधी मनपाने वर्ग केल्यानंतर महावितरणला हे काम लवकर सुरू करण्याचा प्रस्ताव मनपाने दिला होता. तसेच वीज बील किंवा अन्य कामासाठी हा निधी नंतर महावितरणे मनपाकडे वर्ग करावा, अशीही तयारी मनपाने केली होती. मात्र, हा निधी परत देताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतील, असे कारण महावितरणने दिल्यामुळे पुन्हा आता हा प्रस्ताव देखील रेंगाळला आहे. आता विद्युत खांब हटविण्यासाठी शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची वाट पहावी लागणार आहे.

डिसेंबरपर्यंत पुलाचे काम होणे अशक्य ?

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गेल्या महिन्यात या पुलाच्या कामाची पाहणी केली होती. तसेच पुलाची पाहणी केल्यानंतर मक्तेदाराला डिसेंबरपर्यंत पुलाचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सद्य:स्थितीत विद्युत खांब हटविण्याची प्रक्रिया पाहता डिसेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे.