अल्पवयीन मुलाने अपघात केल्यास वडीलांना होईल तीन वर्ष कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:08 IST2018-08-06T13:45:46+5:302018-08-06T14:08:40+5:30
पालकांच्या नावावर असलेले वाहन त्यांच्या अल्पवयीन अपत्याने चालवून अपघात केल्यास पालकांना जबाबदार धरून त्याबद्दल त्यांना तीन वर्षांची कैद व २५ हजार रुपये दंड करून, त्याशिवाय संबंधित वाहनाची नोंदणी कायमसाठी रद्द करण्याची नवी तरतूद मोटार वाहन कायद्यात नवीन तरतूद करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलाने अपघात केल्यास वडीलांना होईल तीन वर्ष कैद
जळगाव : पालकांच्या नावावर असलेले वाहन त्यांच्या अल्पवयीन अपत्याने चालवून अपघात केल्यास पालकांना जबाबदार धरून त्याबद्दल त्यांना तीन वर्षांची कैद व २५ हजार रुपये दंड करून, त्याशिवाय संबंधित वाहनाची नोंदणी कायमसाठी रद्द करण्याची नवी तरतूद मोटार वाहन कायद्यात नवीन तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब अशा आपत्कालीन वाहनांना रस्त्यात वाट करून न देणाºया वाहन चालकास १० हजार रुपयांचा दंड होईल.
भारतात दरवर्षी ५ लाख रस्ते अपघात होतात व त्यात दीड लाख लोकांचे प्राण जातात.
रस्ते वाहतूक सुरक्षित व्हावी, लोकांनी वाहने जबाबदारीने चालवावित आणि रस्ते अपघातांत जखमी मृत होणाºयांना लवकर न्याय आणि भरीव भरपाई मिळावी यासाठी सध्याच्या मोटार वाहन कायद्यात दुरुस्त्या करण्याच्या विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार या कायद्याच्या एकूण २२३ पैकी ६८ कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे, तर २८ कलमे पूर्णपणे नव्याने समाविष्ट करण्यात येणार आहेत.
परिवहन कायद्यात सुरुवातीपासून अल्पवयीन मुलाने अपघात केल्यास वाहनमालकावर कारवाईची तरतूद आहे. केंद्रीय परिवहन मंत्र्यांनी काही निर्णय घेऊन त्यात आणखी सुधारणा केली आहे. त्याचे परिपत्रक अद्याप प्राप्त झालेले नाही. अशा प्रकरणात दंड आकारुन तडजोड करण्याचा अधिकार वाहतूक शाखेला आहे.
-सागर शिंपी, प्रभारी अधिकारी, शहर वाहतूक शाखा