शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळल्यास आॅडीटरवरही होणार कारवाई - प्रफुल्ल छाजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:54 IST

सहकारी बँकांचे राज्यस्तरीय चर्चासत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन

जळगाव : देशातील काही बँकांमधील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकार समोर येऊ लागल्याचा अनुभव पाहता सहकारी बँकांच्याही व्यवहारांची बारकाईने तपासणी होणार असून यात लेखा परीक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे लेखापरीक्षक, सीए यांनी आपापली जबाबदारी काळजीपूर्वक पूर्ण करावी, असा सल्ला द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटस् आॅफ इंडियाचे अध्यक्ष सी.ए. प्रफुल्ल छाजेड यांनी दिला.जळगाव जनता सहकारी बँक व सहकार भारती यांच्या संयुक्तविद्यमाने मंगळवारी सहकारी बँकांसाठी राज्यस्तरीय चर्चासत्र झाले, त्या वेळी ते बोलत होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वालन करून चर्चासत्राचे उद््घाटन झाले.प्रास्ताविक सहकार भारतीचे अखिल भारतीय बँकिंग प्रकोष्ठ प्रमुख संजय बिर्ला यांनी केले. जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सहकार हा विचार रुजविणे नाही तर वाढविणे हा हेतू डोळ््यासमोर ठेवून सहकार चळवळ पुढे नेण्याचे आवाहन केले.बँक संचालकांसोबत सीएंवरदेखील मोठी जबाबदारीआर्थिक संस्था व सीए यांचे सुरुवातीपासून जवळचे नाते आहे, मात्र आर्थिक संस्थांमधील काही घटनांमुळे हे नाते वेगळे आहे का?, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळेच आर्थिक संस्था, कंपन्यांसोबत आता सीएंचे नावदेखील पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे बँक संचालकांसोबत सीएंवरदेखील मोठी जबाबदारी येत असल्याचे प्रफुल्ल छाजेड यांनी नमूद केले. बँकांमधील गैरव्यवहार पाहता बँकांच्या लेखा परीक्षकांसाठी प्रशिक्षण सक्तीचे करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी त्यांनी बँकांचे लेखा परीक्षण करताना दक्षता घेण्याविषयी विविध मुद्यांवर माहिती दिली.भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक व सहकार भारतीचे संरक्षक सतीश मराठे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन जनता बँकेचे संचालक कृष्णा कामठे यांनी केले तर नितीन झवर यांनी आभार मानले.दिवसभर विविध सत्रउद््घाटनानंतर दिवसभर सहकारी बँकांसंबंधी बदलती आव्हाने पेलण्यासाठी सद्य परिस्थितीतील जोखीम व्यवस्थापन, व्यावसायिक धोरणे, क्षमता व विकास अशा विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.समारोप सत्रात सहकार भारतीचे सरचिटणीस डॉ. उदय जोशी यांनी सहकारी बँकांच्या विकासासाठी सहकार भारती पाठिशी उभी असल्याची ग्वाही दिली. अनिल राव यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगून अशा चर्चासत्रांसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. विविध सत्रांचे सूत्रसंचालन स्वाती भावसार यांनी केले तर जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील यांनी आभार मानले.या वेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे प्रकल्प प्रमुख भरत अमळकर, दलुभाऊ जैन, भालचंद्र पाटील, सीए प्रकाश पाठक, सी.ए. असोसिएशनच्या जळगाव शाखेच्या अध्यक्षा स्मिता बाफना, माजी अध्यक्षा पल्लवी मयूर यांच्यासह ३६ सहकारी बँकांचे प्रतिनिधी, सीए मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव