जळगाव- नवीन बसस्थानक आवारातील अन्नपूर्णा रेस्टॉरंटजवळ मृत अवस्थेत सापडलेल्या तरूणाची शनिवारी ओळख पटली़ नागेश भाईदास बैरागी (वय-३५, रा.वरणगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी व्हॉटस्अॅप ग्रुपवर पाठविलेल्या छायाचित्रामुळे त्याची ओळख पटली आहे़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ओळख पटावी यासाठी पोलिसांच्या गु्रपसह इतर ग्रुपवर छायाचित्र पाठविले. त्यानुसार शनिवारी मृत तरूणाची वहिणी सिमा बैरागी यांना फोटो दिसताच त्यांनी जिल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधला व तरूणाची ओळख पटविली़ त्यानंतर मृत तरूण हा नागेश बैरागी नामक असल्याचे समोर आहे़अतिमद्यसेवनामुळे मृत्यूनागेश यास दारुचे व्यसन होते़ त्यामुळे तो घरातून निघून गेला होता़ नवीन बसस्थानकाच्या आवारात मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह करत होता़ मात्र, शुक्रवारी त्याचा अतिमद्यसेमवनामुळे मृत्यू झाला़ त्याच्या पश्चात भाऊ दुगार्दास, नंदकिशोर, वहिनी सिमा असा परिवार आहे.
जळगावात व्हॉटस् अॅपमुळे पटली तरूणाची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:05 IST
जळगाव- नवीन बसस्थानक आवारातील अन्नपूर्णा रेस्टॉरंटजवळ मृत अवस्थेत सापडलेल्या तरूणाची शनिवारी ओळख पटली़ नागेश भाईदास बैरागी (वय-३५, रा.वरणगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी व्हॉटस्अॅप ग्रुपवर पाठविलेल्या छायाचित्रामुळे त्याची ओळख पटली आहे़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ओळख पटावी यासाठी पोलिसांच्या गु्रपसह इतर ग्रुपवर छायाचित्र पाठविले. ...
जळगावात व्हॉटस् अॅपमुळे पटली तरूणाची ओळख
ठळक मुद्देव्हॉटस्अॅप ग्रुपवर पाठविलेल्या छायाचित्रामुळे पटली ओळखमृत तरुणाच्या कुटुंबियांनी साधला पोलिसांशी संपर्कअति मद्य सेवनामुळे झाला मृत्यू