नशिराबाद जवळ झालेल्या अपघातातील मयतांची ओळख पटली, गेंदालाल मिल परिसरात शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 12:27 IST2018-08-02T12:22:06+5:302018-08-02T12:27:31+5:30
अपघातात पाच जण जखमी

नशिराबाद जवळ झालेल्या अपघातातील मयतांची ओळख पटली, गेंदालाल मिल परिसरात शोककळा
जळगाव / नशिराबाद : राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादनजीक बुधवारी (१ आॅगस्ट) मध्यरात्रीनंतर दोन कारची समोरासमोर धडक होऊन ठार झालेल्या चारही मयतांची पहाटे ओळख पटली असून ते जळगावातील गेंदालाल मिल परिसरात रहिवासी आहेत. समुद्रगुप्त उर्फ बंटी चंद्रगुप्त सुरवाडे (२०), दीपक अशोक चव्हाण (२२), सुबोध मिलिंद सुरवाडे (२८), रोहीत जमदाडे अशी मयतांची नावे आहेत.
या अपघातात पाच जण जखमी असून त्यांच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने गेंदालाल मिल परिसरात शोककळा पसरली आहे.
नशिराबादनजीक वळणावर काझी पेट्रोलपंपाजवळ हा भीषण अपघात झाला. जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या कार क्रमांक एमएच 19 बीयू 8710 आणि समोरु येणाºया एमएच 19 सीयू 6633 यांची समोरासमोर टक्कर झाल्याची माहिती मिळाली.