शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आयसीएमआरचे पथक संकलित करणार चारशे जणांचे रक्तनमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:14 IST

चेन्नईला होणार संशोधन : दहा पथकांचे आज दहा ठिकाणी सर्व्हेक्षण

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग किती प्रमाणात आहे, कोणाला कोरोना होऊन गेलेला आहे का, त्यांच्या प्रतिकार क्षमता किती विकसित झाली आहे़, या सर्व बाबींच्या तपासणीसाठी आयसीएमआरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पंधरा जणांचे पथक गुरूवारी जिल्हाभरात सर्व्हेक्षण करणार आहे़ हे पथक बुधवारीच जिल्ह्यात दाखल झाले. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली दहा पथके जिल्ह्यातील दहा ठिकाणाहून प्रत्येकी चाळीस अशा चारशे जणांचे रक्तनमुने घेणार आहेत़ यावर चेन्नई येथे संशोधन होणार आहे.आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत कोविडच्या पार्श्वभूमीवर नॅशनल सेरो सर्व्हे केला जाणार सहा जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे होणार आहे़ आयसीएमआरचे पथक हा सर्व्हे करणार आहे़ दरम्यान, आरोग्य संचालकांनी आधिच सर्व आढावा घेतला असल्याने पथकाकडून थेट सर्व्हेक्षणाचेच काम होणार असल्याची माहिती आहे़यांचा आहे समावेशजागतिक आरोग्य संघटनेचे समुपदेशक, आयसीएमआर (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंशोधन परिषद) यांचे वैद्यकीय अधिकारी त्यांच्यासह तंत्रज्ञ यांचा पथकात समावेश राहणार असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ यासह दहा ठिकाणचे दहा वैद्यकीय अधिकारी व स्थानिक दहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा पथकांमध्ये समावेश राहणार आहे़चैन्नईला होणार तपासणीरक्तनमुने संकलीत केल्यानंतर एक दोन दिवस स्थानिक रुग्णालयात सर्व प्रक्रिया करून मग हे सर्व नमुने चैन्नई येथे प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी पाठविण्यात येणार आहे़ ही अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट असणार आहे़ कोरोनाचा संसर्ग कोणाला झाला होता़ प्रतिकारशक्ती कशी आहे़ अशा काही तपासण्या यातून होणार आहे़ कोणाला कोरोना होऊन गेला आहे का? याचीही माहिती यातून समोर येणार आहे़ चैन्नईला यावर संशोधन होणार आहे़ अ‍ॅन्टीबॉडी कोणात तयार झाल्या आहेत, यावर तपासणी होऊन त्याचे अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे येणार आहे़जिल्ह्यात झपाट्याने फैलावजिल्हाभरात कोरोना संसर्गाचा झपाट्याने फैलाव झाला असून एप्रिल अखेर व मेच्या आधिच्या आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णांनी दोनशेचा आकडा पार केला होता़ रोज दहाच्यावरच रुग्ण आढळून येत आहेत़ त्यातच बुधवारी दिवसभरात २९ रुग्ण आढळून आल्याने ३४६ रुग्ण संख्या झाली आहे़ दुसरीकडे मृतांचा आकडाही चिंता वाढविणार आहे़ जिल्हाभरात बुधवारी सायंकाळपर्यंत ३८ जणांचा मृत्यू झालेला होता़ यातील अनेकांचे मृत्यूनंतर अहवाल प्राप्त झाले आहे़या ठिकाणी जाणार पथकयावल तालुक्यातील मोहराळे, रावेर तालुक्यातील तांदलवाडी, जळगाव तालुक्यातील कडगाव, धरणगाव, भडगाव तालुक्यातील वरखेडे, पाचोरा येथील नाईकनगर, जामनेर येथील गोराडखेडा, भुसावळ येथील वॉर्ड नं ४५, जळगाव येथील वॉर्ड नं ५७, चाळीसगाव येथील वॉर्ड नं २८ या ठिकाणच्या रँडमली दहा घरंची निवड करून प्रत्येकी चार अशा चाळीस जणांची प्रत्येक गावातून तपासणी केली जाणार आहे़ पंधरा दिवसानंतर पुन्हा तपासणी घेण्यात येणार आह़े त्यानंतर महिन्याच्या अंतराने ही तपासणी होणार असल्याची माहिती आहे़बरे होणाºयांचे प्रमाण समाधानकारकरुग्ण संख्या वाढत असली तरी कोरोनातून बरे होणाºयांचे प्रमाणही समाधानकारक असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे़ बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील १३४ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे़ दहा दिवसांच्या नियमानुसार लक्षणे नसलेल्याना घरी सोडण्यात येत आहे़ त्यात या रुग्णांचा समावेश आहे़पथक बुधवारीच जिल्ह्यात दाखल झाले असून गुरूवार व शुक्रवार असे दोन दिवस जिल्ह्यात दहा ठिकाणी सर्व्हे करणार आहे़ त्यांच्यासोबत स्थानिक वैद्यकीय अधिकारी, स्थानिक आरोग्य कर्मचारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ राहणार आहे़ दहा पथके हा सर्व्हे करणार आहेत़ रक्तनमुने घेऊन त्यावर चैन्नई येथे संशोधन होणार आहे़-डॉ़ एऩ एस़ चव्हाण,जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव