पारोळा : शहरात सायंकाळी ५.४५ वाजता अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गणेशमूर्ती विक्रेते, दुकानदारांची एकच धावपळ उडाली.मुसळदार पावसाच्या हजेरीत विक्रीसाठी ठेवलेल्या गणेशमूर्तीदेखील ओल्या झाल्या. तर गणेश मंडळांची आरास पाण्यात भिजली. यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांंची तसेच मूर्ती खरेदीसाठी आलेल्या भाविकांची एकच धावपळ उडाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या पाऊसधारांनी शहरात पाणीच पाणी केले. अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले. लवणगल्लीला नदीचे स्वरूप आले होते.
पारोळ्यात जोरदार पावसाने गणेशमूर्ती भिजल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 21:38 IST