शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 19:56 IST

जिल्ह्याच्या अनेक भागात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

ठळक मुद्देधरणगावला झाड व वीजेचे खांब कोसळले , टोणगावला गारांचा पाऊस 

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव  : जिल्ह्याच्या अनेक भागात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतीवाडीचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. धरणगाव येथे वादळी वाऱ्यामुळे झाड आणि विजेचे खांब कोसळले. पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. टोणगाव येथे गारांचा पाऊस झाला. 

धरणगाव येथे  दुपारी  तीन वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह  जोरदार पाऊस झाला. मोठा माळीवाडा, रामलीला चौक या ठिकाणी झाड कोसळले. ही झाडे नेमकी वीज खांबावर कोसळली. यामुळे मोठ्या प्रमाणावर शॉर्ट सर्किट झाल्याने  या भागातील नागरिकांच्या घरातील फ्रीज, टीव्ही यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एक झाड चारचाकी वाहनावर आदळले. 

 सुदैवाने यात कुठलीही  जीवित हानी झाली नाही. या ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. खेडगाव ता. भडगाव येथे  पाच मिनिटे  पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. भडगाव परीसरातील टोणगाव शिवारात १० मिनीटे गारासह पाऊसही झाला. 

पहूर येथे पाऊस

पहूर ता. जामनेर येथे  सोमवारी अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात काही वेळ गारवा जाणवत होता. मात्र या पाऊसाने काही  शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊसagricultureशेती