The Hatia-Pune Express accident has been avoided with the alert of staff in Bhusawal | भुसावळात कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने हटिया-पुणे एक्सप्रेसचा अपघात टळला
भुसावळात कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने हटिया-पुणे एक्सप्रेसचा अपघात टळला

वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : गोरखपूरकडून पुण्याकडे जाणाºया हटिया एक्सप्रेसच्या एका कोचच्या चाकाचे नटबोल्ट निघाले. ही बाब कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आल्याने या गाडीचा अपघात टळला. गाडीपासून कोच वेगळा करून गाडी सुमारे अडीच तास उशिराने पुण्याकडे रवाना करण्यात आली.
गाडी क्रमांक २२८४० ही गाडी भुसावळरेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक तीन वर येत होती. तेव्हा रोलिंग इनचे कर्तव्यावर असणारे कर्मचारी हे गाडीचे निरीक्षण करीत होते. या गाडीचा एसी कोच क्रमांक बी -२ च्या उजव्या बाजूचा एक्सल होल्डिंग आर्म तुटल्याचे लक्षात आले. ही माहिती कर्तव्यावर असणाºया कर्मचाºयांनी त्वरित वरिष्ठ अधिकारी, एसीएम अजयकुमार, डीसीआय सुदर्शन देशपांडे, सीटीआय एस.खरात, एओएम जे.एम.रामेकर, एसडी गोपी अय्यर हे त्वरित फलाट क्रमांक तीनवर आले. गाडीचे परीक्षण केल्यानंतर बी-२ हा डबा गाडीपासून वेगळा करण्यात आला व सायंकाळी ५:५५ मिनिटांनी आलेली गाडी रात्री आठ ८:१५ मिनिटांनी म्हणजे तब्बल अडीच तासाच्या उशिरानंतर पुण्याकडे सोडण्यात आली.
दरम्यान, प्रभावित डब्याचे प्रवासी अन्य इतर एसी कोचमध्ये बसविण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांची मात्र गैरसोय झाली. त्यांना अडीच तासापर्यंत स्थानकावर ताटकळत थांबावे लागले.

Web Title: The Hatia-Pune Express accident has been avoided with the alert of staff in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.