भुसावळात शिक्षक संघटनांतर्फे हाथरस प्रकरणाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:48 IST2020-10-07T14:47:06+5:302020-10-07T14:48:13+5:30
हाथरस येथे घडलेल्या घटनेचा निषेध भुसावळ तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी केला आहे

भुसावळात शिक्षक संघटनांतर्फे हाथरस प्रकरणाचा निषेध
भुसावळ : उत्तर प्रदेशामधील हाथरस येथे घडलेल्या घटनेचा निषेध भुसावळ तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी केला असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा प्रकारचे मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली.
निवेदनात म्हटले आहे की, हाथरस येथे घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी तसेच सुरक्षा पुरवावी. परस्पर केलेल्या अंत्यसंस्काराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनावर ईब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, शिक्षक परिषदेचे एस.एस.अहिरे, प्रशांत नरवाडे, अनिल माळी, संजय भटकर, जे.पी.सपकाळे, सुनील वानखेडे आदींच्या सह्या आहेत.