००००००००००
जानकीबाई बाहेती विद्यालय
जानकीबाई आनंदराम बाहेती विद्यालयात प्रतिमा पूजन मुख्याध्यापक पी़ आर.जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी एन.एस.चौधरी, सरला चौधरी, सुनिता महाजन, टी.एस.माळी, पी.एम.पवार, के.एच.पाटील, डी.जी.पाटील आदींची उपस्थिती होती़
००००००००००००
जिजामाता माध्यमिक विद्यालय
हरिविठ्ठल नगरातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी प्रतिमा पूजन करून पूष्पहार अर्पण केले. यावेळी शिक्षक संजय खैरनार, कृष्णा महाले, संगीता पाटील, दिनेश सोनवणे, विकास तायडे व शिक्षकेतर कर्मचारी संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आशा पाटील तर आभार प्रदर्शन किशोर पाटील यांनी केले.
०००००००००००
नूतन मराठा विद्यालय
नूतन मराठा विद्यालय येथे मुख्याध्यापक एस.व्ही.मराठे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी अे.पी.सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक डी.एस.सोनवणे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
००००००००००००
संस्कृती माध्यमिक विद्यालय
मेहरूण येथील संस्कृती माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका डॉ. डिंपल येवले यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर सुजाता प्रसाद, राज महाजन, प्रियंका पालवी, माधुरी विसपुते, प्रणाली विसपुते, नम्रता विसपुते, गौरांगी पाटील यांनी भाषणे केली. यावेळी ज्योती सोनवणे, अश्विनी फालक, सुहास कोल्हे, माधुरी बिजलपुरे, ईश्वर पाटील, विवेकानंद तायडे, कविता पाटील आदींची उपस्थिती होती.