"संजय राऊतांनी चौकटीत बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेन"

By Ajay.patil | Updated: April 20, 2023 11:25 IST2023-04-20T11:16:55+5:302023-04-20T11:25:55+5:30

संजय राऊत आज जिल्ह्यात असताना गुलाबराव पाटलांचा इशारा

Gulabrao Patil gives warning that Sanjay Raut should speak in a box, otherwise I will enter his meeting | "संजय राऊतांनी चौकटीत बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेन"

"संजय राऊतांनी चौकटीत बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेन"

अजय पाटील, जळगाव: स्वर्गीय आर.ओ. पाटील यांचा पुतळ्याच्या अनावरणासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत आहेत. आर. ओ. पाटील व उद्धव ठाकरे यांच्यात चांगले संबंध होते. मात्र, या सभेत जर संजय राऊत हे चौकटीत बोलले नाहीत. तर मी त्यांचा सभेत घुसेल असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता, स्वर्गीय आर . ओ.पाटील यांच्याशी आमचे चांगले संबंध होते. तसेच उद्धव ठाकरे यांचे देखील चांगले संबंध आहेत. त्यामुळे या सभेला आमची काहीही हरकत नाही. मात्र या सभेत जर खासदार संजय राऊत यांनी आमच्यावर बोलताना चौकट सोडली, तर थेट त्यांचा सभेत घुसेल असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान याबाबत गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन, त्यांना या सभेत ठाकरे गटाचे खासदार चौकटी सोडून बोलणार नाहीत याबाबतचे निवेदन देणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी पत्रकारांना दिली.

Web Title: Gulabrao Patil gives warning that Sanjay Raut should speak in a box, otherwise I will enter his meeting