शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण भरारी १,१५,०००च्या दिशेने; नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोनच दिवसात तीन हजाराने वाढ

By विजय.सैतवाल | Updated: September 23, 2025 15:21 IST

दोन दिवसात सोने दोन हजार ९५० रुपयांनी तर चांदी चार हजार ५०० रुपयांनी वधारली. 

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : पितृपक्ष संपून घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोनच दिवसात सोने-चांदीच्या भावात मोठी भाववाढ झाली. मंगळवारी (२३ सप्टेंबर) सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख १४ हजार ४०० रुपयांवर पोहचले आहे. चांदीच्याही भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ३६ हजार रुपयांवर पोहचली. दोन दिवसात सोने दोन हजार ९५० रुपयांनी तर चांदी चार हजार ५०० रुपयांनी वधारली. 

गेल्या महिन्याभरापासून सोने-चांदीच्या भावात सतत वाढ सुरू आहे. त्यात घटस्थाननेच्या दिवशी, सोमवारी (दि. २२) सोन्याच्या भावात एक हजार ९५० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १३ हजार ४०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर मंगळवारी (दि. २३) पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १४ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. 

दुसरीकडे घटस्थाननेच्या दिवशी चांदीच्याही भावात थेट तीन हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ३५ हजार रुपयांवर पोहचली. मंगळवारी पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ३६ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.  

असे आहे भावधातू - मूळ भाव - जीएसटीसहसोने - १,१४,४०० - १,१७,८३२चांदी - १,३६,००० - १,४०,०८०

अमेरिकन फेडरल बँकेने गेल्या आठवड्यात व्याज दरात कपात केली. त्यानंतर आता पुन्हा व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढून त्यांच्या भावात वाढ होत आहे. सोने-चांदीत तेजीचा वेग यापुढेही कायम राहत दिवाळीपर्यंत सोने एक लाख ३५ हजार तर चांदी एक लाख ७५ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. - अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सुवर्ण बाजार असोसिएशन.

टॅग्स :GoldसोनंSilverचांदी