शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सुवर्णनगरी जळगावात सुवर्ण व्यवसाय व ‘रिअल इस्टेट’ला ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:48 IST

बँकांचे घटते व्याज दर व शेअर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

जळगाव : बँकांचे घटते व्याजदर व शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे सुवर्ण व्यवसाय व घर, प्लॉट खरेदीकडे नागरिकांचा कल वाढत असल्याने या व्यवसायास चांगले दिवस आले असल्याचे सुखद चित्र आहे. यामुळे नोटाबंदीनंतर आलेली मरगळ दूर होऊन हे व्यवसायात पुन्हा पूर्वीचे दिवस येत आहे.दोन वर्षांपासून नागरिकांची पाठदोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय झाला आणि त्यानंतर रिअल इस्टेट व्यवसायात मोठी मंदी आली. अनेकांचे पैसे बँकांमध्ये अडकल्याने सुरुवातीच्या काळात तर हे दोन्ही व्यवसाय संकटात सापडले होते. त्यामुळे घर व मोकळ््या जागांमध्ये गुंतवणूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांची घरे तयार असल्यानंतरही विक्री होत नव्हती. परिणामी या व्यावसायिकांसमोर बँकांचे कर्ज फेड कशी करावी, असाही प्रश्न निर्माण झाला होता.बँकांमध्ये व्याज मिळेना, शेअर बाजारात अस्थिरताबँकांमध्ये ठेवी ठेवण्यावर अनेकांचा कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून बँकांकडून मिळणारे व्याजदर कमी होत आहे. त्यामुळे मोठी रक्कम बँकांमध्ये ठेवूनही अपेक्षित परतावा मिळत नाही. या सोबतच गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातही अस्थिरता असल्याने अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास धजावत नसल्याचे सांगितले जात आहे.घरांची मागणी वाढू लागलीशहरी भागात येणाऱ्या नागरिकांची संख्या व वाढते कुटुंब यामुळे अनेकांनी घर खरेदीकडे पुन्हा आपला कल वळविला असल्याचे चित्र दिवाळीनंतर निर्माण झाले आहे. नोटाबंदीनंतर आलेला गुढीपाडवा, दसरा, दिवाळी या काळातही मंदीचे वातावरण होते. मात्र यंदाच्या दिवाळीपासून घरांन मागणी वाढू लागली. त्यात दिवाळीनंतर तर अनेक जण घरांची खरेदी करू लागले आहे. परिणामी गेल्या महिन्याभरापासून घर खरेदीसाठी अनेक जण वेगवेगळ््या ठिकाणी चौकशी करून घर खरेदी करीत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. विशेष म्हणजे १५ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंतच्या सर्वच घरांची यात विक्री होत असल्याचेही चित्र आहे. बँकांच्या घटलेल्या व्याजदरांचाही फायदा घेत गृहकर्ज घेऊन घर खरेदी वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मागणीघरांची गरज वाढू लागल्याने घरांची मागणी वाढत असताना त्या सोबतच बँक व शेअर बाजाराची स्थिती पाहता सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण सोन्यामध्ये गुंतवणूक करीत आहेत. भावात थोडी फार चढ-उतार होत असली तरी सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानत केव्हाही परतावा मिळण्याच्या अपेक्षेने नागरिक पुन्हा सोन्याची खरेदी करीत आहेत.लग्नसराईमुळे मागणीत भरसध्या लग्नसराईमुळेदेखील सोन्याला मागणी वाढली आहे. सोन्यास वाढत्या मागणीमुळे भावातही वाढ होत आहे. असे असले तरी ग्राहक सोने खरेदीस पसंती देत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.नोटाबंदीनंतर अनेकांकडे हाती पैसा नसल्याने घर खरेदी मंदावली होती. ही थांबलेली घर खरेदी पुन्हा सुरू झाली असून नागरिकांना गरज असल्याने घरांची मागणी करीत आहे. मोठी उलाढाल सध्या नसली तरी एक चांगली सुरुवात झाली आहे.- अनिश शाह, सदस्य, राज्यस्तरीय समन्वय समिती, क्रेडाई.दोन वर्षांपूर्वी सुवर्ण व्यवसायात आलेली मंदी दूर झाली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण पुन्हा सोने खरेदी करू लागले आहेत.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ असोसिएशन.

टॅग्स :businessव्यवसायJalgaonजळगाव