शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

परिवारातील वादामुळे देव बंदिस्त

By admin | Updated: July 18, 2014 12:54 IST

पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील वाद विकोपाला पोहोचला असून परिवाराचे दैवत असलेल्या श्रीकृष्णाला ज्ञानेश्‍वर मंदिरातील एका सील लावलेल्या गृहामध्ये राहावे लागत आहे.

 

जळगाव : पांडुरंगशास्त्री आठवले प्रणीत स्वाध्याय परिवारातील सदस्यांमधील वाद एवढा विकोपाला पोहोचला की या परिवाराचे दैवत असलेल्या भगवान श्रीकृष्णाला ज्ञानेश्‍वर मंदिरातील दुसर्‍या मजल्यावरील एका सील लावलेल्या काचेच्या कपाटात व कपाटापुढील द्वारावर कुलूप असलेल्या गृहामध्ये राहावे लागत आहे. 
ज्ञानेश्‍वर मंदिरातील काही सदस्य हे स्वाध्याय परिवारात होते. पण परिवारात वाद सुरू झाले. या वादात मंदिरातील सदस्य ओढले गेले. त्यात ज्ञानेश्‍वर मंदिर ट्रस्टचे सु.का. जोशींचाही समावेश होता. यात १८ ऑगस्ट २00४ रोजी ज्ञानेश्‍वर मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या हातात चक्र धरलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुरू होती. याच दिवशी एका व्यक्तीने जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दाखल झाली. त्यात मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असलेली मूर्ती कॉपीराईट आहे. ती ताब्यात घ्यावी, अशी तक्रार होती. फिर्यादींमागे स्वाध्याय परिवाराशी संबंधित सद्विचार ट्रस्टचे कौशिक मेहतादेखील होते. याच दिवशी पोलिसांनी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ताब्यात घेतली. 
सु.का. जोशी यांनी हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मूर्ती परत मिळावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने ही मूर्ती जोशी यांच्या ताब्यात द्यावी, असे आदेश दिले आणि अखेर ६ फेब्रुवारी २00८ रोजी या मूर्तीची ज्ञानेश्‍वर मंदिरात पुन्हा स्थापना झाली, पण मूर्ती गाभार्‍यात कापडामध्ये गुंडाळून ठेवली होती व गाभार्‍याच्या दरवाजाला कुलूपही होते. ज्ञानेश्‍वर मंदिरात मूर्ती आली, पण तिची पूजा करता येत नव्हती. उच्च न्यायालयाच्या (खंडपीठ) निर्देशानुसार जिल्हापेठ पोलिसांनी २६ मार्च २00८ रोजी ज्ञानेश्‍वर मंदिरामध्ये एक पारदर्शक काच लावलेल्या कपाटात (शोकेस) भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली. या कपाटाला दोन कुलुपे असून, सील लावले आहे. जिल्हापेठ पोलिसातील उपनिरीक्षकांनी पंच आशिष पाटील व विजय पाटील यांच्यासमोर हे सील लावले. दुसर्‍या मजल्यावर विठ्ठल-रुख्मिणींची प्राणप्रतिष्ठा केलेल्या एका गाभार्‍यामागे हे काचेचे कपाट आहे. या कपाटासमोरच एक लोखंडी सळय़ांचा दरवाजा असून, त्यालाही कुलूप लावले आहे. मूर्तीखाली या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या मूर्तीची पूजा करण्यास मनाई आहे, असा उल्लेख असलेला फलक आहे.
------------------
कॉपीराईटसंबंधी लवकरच केंद्रीय मानव संसाधनमंत्री स्मृती इराणी यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेणार आहोत. भगवान श्रीकृष्णांची मूर्ती बंदिस्त शोकेसमधून बाहेर निघेल व आम्हाला पूजा करण्याचा अधिकार मिळेलच, अशी अपेक्षा आहे. 
-उमाकांत वाणी, याचिकाकर्ते