शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश महाजन प्रसिद्धीपटू, अंत्ययात्रेला गेले तर तेथेही सेल्फी काढतील : अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 19:48 IST

पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रसिद्धी पटू असून, ते कुठेही सेल्फी काढतात. उद्या एखाद्या ठिकाणी अंत्ययात्रेत गेले तर मृतदेहासोबतही ते फोटो काढतील. आपण दु:खात आलो आहोत याचे भान विसरून ते आनंद साजरा करतील, असे हे व्यक्तिमत्व असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठळक मुद्देचाळीसगाव येथील प्रचार सभेत अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची टीकाराज्यकर्त्यांचे डोके फक्त वाळू तस्करीत अडकले

चाळीसगाव, जि.जळगाव : राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रसिद्धी पटू असून, ते कुठेही सेल्फी काढतात. उद्या एखाद्या ठिकाणी अंत्ययात्रेत गेले तर मृतदेहासोबतही ते फोटो काढतील. आपण दु:खात आलो आहोत याचे भान विसरून ते आनंद साजरा करतील, असे हे जिल्ह्याचे व्यक्तिमत्व असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी चाळीसगाव येथे मंगळवारी दुपारी सभेत केली.चाळीसगाव येथील वंचित बहुजन आघाडीच उमेदवार मोरसिंग राठोड यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.ते म्हणाले, अजिंठा, वेरुळ या पर्यटनस्थळाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. या पर्यटनस्थळासाठी जपान सरकारने निधी दिला होता. या पर्यटनस्थळाचा विकास झाला असता तर जळगाव व औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वाधिक विकास झाला असता. परंतु या पर्यटनाला चालना मिळू शकली नाही. या राज्यकर्त्यांचे डोके फक्त वाळू तस्करीत अडकले आहे, असा आरोपही त्यांनी केला.जळगाव जिल्हा हा शुद्ध सोन्याच्या बाबतीत अव्वल आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लोकांची बाजारपेठ विश्वासास पात्र आहे. त्यामुळे या जिल्ह्याला देशात अतिशय महत्व आहे. या भांडवलाचा योग्य वापर केला असता तर जळगाव हे देशातील सर्वात मोठे माकेर्टींग केंद्र होऊ शकले असते. दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. वंचित बहुजन आघाडीला सत्ता दिल्यास जळगाव हे देशाच्या नकाशावर विकसीत गाव करणार असल्याची घोषणा आंबेडकर यांनी केली.व्यासपीठावर जळगावचे शफी शेख, जळगाव ग्रामीणचे रवी देशमुख, पाचोऱ्याचे नरेश पाटील, संभा जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाChalisgaonचाळीसगाव