शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

गिरीश महाजन यांनी स्वीकारले अजित पवारांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 11:25 IST

भाजपाचा शक्ती प्रमुख मेळावा

जळगाव : अजित पवारांनी बारामतीत येवून दाखवावे, असे आव्हान दिले होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण बारामती व अजित पवारच काय तर कोणाचेही आव्हान स्विकारण्यास तयार आहोत, असे प्रतिआव्हान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना रविवारी दिले आहे.जळगावात रविवारी दुपारी भाजपाच्या जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार लोकसभा क्षेत्र शक्ती प्रमुख संमेलन टीव्ही टॉवरनजीकच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित नेत्यांनी राहूल गांधी, शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली.जळगावात रविवारी दुपारी शहरातील दूरदर्शन टॉवर केंद्राजवळ ‘अटल नगर’ येथे आयोजित भाजपाच्या जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार लोकसभा मतदार संघातील शक्ती प्रमुख संमेलनात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, माजी मंत्री एकनाथराव खडसे, रामदास अंबटकर, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विजय चौधरी, खासदार रक्षाताई खडसे, खासदार ए.टी.पाटील, खासदार हीना गावीत, सिंधी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरूमुख जगवाणी, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, आमदार चैनसुख संचेती, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार हरिभाऊ जावळे, जि. प. उपाध्यक्षा उज्वला पाटील, महापौर सिमा सीमा भोळे, धुळे येथील महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी खासदार एम. के. अण्णा पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, बबनराव चौधरी, नंदुरबार भाजपा संघटक कांतीलाल टाटिया उपस्थित होते.महाजन म्हणाले की, एकीकडे पवार बारामतीत बोलवतात तर दुकरीकडे पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील बोलवतात. मी एकटा कोठे कोठे उभा राहणार? आपण सर्वाचेच आव्हान स्विकारले, भाजपाला कोणी आव्हान देवू नये असेही त्यांनी सुनावले. राज्यात भाजपाच्या लोकसभेच्या सर्व जागा भाजपा मिळवेल यात शंका नाही. उत्तर महाराष्ट्रतील जबाबदारी माझ्यावर आहे आणि या भागातील सर्वच जागी भाजपाला यश येईल. विरोधकांना एकही जागा मिळू देणार नाही, हा माझा शब्द आहे. आतापर्यंत जे जे बोललो ते ते करुन दाखविले आह.शरद पवार यांच्यावरही टीकाभाजपाला असंवेदनशील म्हणणाºया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही गिरीश महाजन यांनी टीका केली. गोटे यांच्या जिभेला हाड नाही ! महाजन म्हणाले की, आमदार अनिल गोटे हे धुळे मनपा निवडणुकीत विरोधात गेले त्यावेळी त्यांना आपण सांगितले होते, एकही जागा तुम्हाला मिळणार नाही मात्र चकून एक जागा त्यांना मिळाली. आता मला ते धुळ्यात उभे राहण्याचे एकेरी शब्दात आव्हान देतात. ‘धुळ्यात ते .. माझ्यासमोर येवून दाखव असे म्हणतात. त्यांच्या जिभेला हाड नाही. भाजपाचा साधा कार्यकर्ताच त्यांना पराभूत करण्यास पुरेसा आहे.सुभाष भामरे यांची राहुल गांधी यांच्यावर टीका‘राफेल’ बाबत कॉग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन आहेत. व्यवस्थित माहिती न घेता वारंवार आरोप गांधी यांच्याकडून होत आहेत. त्यामुळे त्यांचा बुध्यांक किती असेल हे देवालाच माहीत, अशी टीका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केली.आमच्या घोषणा देवू नका...कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आगे बढोच्या घोषणा दिल्या. यावरमहाजन म्हणाले की, जयजयकाराच्या घोषणा देवू नका. कार्यक्रमास एकनाथराव खडसे येताच जोरदार घोषणाबाजी झाली. खडसे यांंनी भाषणात खासदार ए. टी. पाटील आणि रक्षा खडसे यांच्यापुढे विरोधकांकडे उमेदवार नाही, असे विधान केले. यावर गिरीश महाजन विनोदाने म्हणाले की, ए. टी. पाटील आणि रक्षा खडसे यांनी हसू नये अजून उमेदवारी निश्चित व्हायच्या आहेत... काम सुरुच ठेवा.सत्ता आणि संपत्ती नसतानाही यश- खडसेएकनाथराव खडसे म्हणाले की, आता पक्षाची शक्ती वाढली आहे. अनेक जण इतर पक्षातूनही आले असून पक्ष अधिक बळकट झाला आहे.केवळ नेत्यांमुळे यश मिळत नाही- जाजूश्याम जाजू म्हणाले की, भाजपा हा संघटनावर भर देणार पक्ष असून कोणी एक व्यक्ती हा पक्ष चालवत नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा हा पक्ष आहे. जयकुमार रावल यांनी विरोधकांवर टीका केली.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव