शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘भुता’ने छातीत सपासप पाइप टाकला अन‌् सत्या जागीच गतप्राण झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

जळगाव : शाहू नगरातील शेख अल्तमस शेख शकील ऊर्फ सत्या (१९) याचा खून हा अगदी क्षुल्लक कारणावरून झाल्याचे उघड ...

जळगाव : शाहू नगरातील शेख अल्तमस शेख शकील ऊर्फ सत्या (१९) याचा खून हा अगदी क्षुल्लक कारणावरून झाल्याचे उघड झाले. अझरुद्दीन ऊर्फ भूत फलीत शेख हुस्नोद्दीन ऊर्फ भिकन (२७,रा. इंदिरानगर, शाहूनगर) याने हा खून केला असून पोलिसांनी त्याला रात्रीतून जेरबंद केले. दरम्यान, शाहूनगरातील जळकी मिल हा अलीकडे खून व आत्महत्येचे केंद्र बनल्याचे दिसून येत आहे.

जळकी मिलच्या आवारात सत्या याचा खून झाल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे शाहूनगरात पुन्हा भीती व दहशतीचे वातावरण पसरले. दरम्यान, पोलिसांनी रात्रीतून अझरुद्दीन ऊर्फ भूत याला अटक केली. चौकशीत त्याने सत्या हा पडक्या खोलीजवळ दारू पीत होता, तेव्हा तू येथे काय करतो आहे रे.. असे विचारले असता तुला काय करायचे आहे.. असे प्रतिउत्तर सत्याने दिले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. खोलीत पडलेला लोखंडी पाईप उचलला आणि सपासप छातीत व पोटावर मारले, त्याशिवाय डोक्यातही दगड मारला, त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. ठार मारणे हा उद्देश नव्हता, परंतु वादात रागावर नियंत्रण न राहिल्याने ही घटना घडल्याची कबुली अझरुद्दीन याने पोलिसांकडे दिली.

रुग्णालयात घेतला मृत्यूचा अंदाज

घटनेनंतर फरार झालेला अझरुद्दीन हा काही वेळाने जिल्हा शासकीय रुग्णालयात गेला, तेथे त्याने सत्या खरेच मृत्युमुखी पडला का? याची माहिती घेतली. तेथील परिस्थिती पाहून तो उस्मानिया पार्क परिसरात गेला. ही माहिती गुन्हे शोध पथकाला मिळताच सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, अक्रम शेख, भास्कर ठाकरे, दीपक सोनवणे, रतन गीते, तेजस मराठे व इतरांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. दुसरीकडे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी घटनास्थळीच ठाण मांडून घटनेचे खरे कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वीही घडल्या घटना

जळकी मिल भाग हा निर्मनुष्य आहे. या भागात दिवसा व रात्री कोणाचाच वावर नसतो. शेजारीच रेल्वेरूळ असल्याने या मार्गाकडे जाणारा रस्ता रहिवाशांनी बंद करून ठेवला आहे. रात्रीच्या वेळी व खासकरून रविवारी मद्यपींचाच या भागात वावर असतो. गेल्या वर्षी एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्याशिवाय सहा वर्षांपूर्वी या भागात एक खून झालेला होता. आता ही तिसरी घटना आहे.