शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

जळगावात विशाखापट्टणम येथून येतो गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:39 PM

महिलांचाही सहभाग

ठळक मुद्देपोलीस संरक्षण मिळत असल्याचे उघडआठवड्यातून दोन दिवस येतो गांजा

जळगाव : पुरी-ओखा या एक्सप्रेसच्या वातानुकुलित बोगीत रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने (आरपीएफ) पकडलेला सहा लाखाचा गांजा हा जळगावातील जाखनी नगर कंजरवाड्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. विशाखापट्टणम व ओडीसा येथून गांजा मोठ्या प्रमाणात जळगाव शहरात येत असून विशेष म्हणजे, त्याला पोलिसांचेही संरक्षण असल्याचे आरपीएफच्या निदर्शनास आले आहे.आरपीएफच्या पथकाला १आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.४० वाजता पुरी-ओखा या एक्सप्रेसच्या बी-२ बोगीतील ३४ ते ३७ या क्रमांकाच्या आरक्षित सीटजवळ गांजाने भरलेल्या ८ बॅगा आढळून आल्या होत्या.त्यात ३१ पॅकेटमध्ये ६५ किलो गांजा होता.जळगाव रेल्वे स्टेशन येताच या बॅगांजवळ दोन पोलीस कर्मचारी पोहचले होते, मात्र आरपीएफचे पथक पोहचताच हे पोलीस तेथून गायब झाले होते.गांजासोबतच्या महिला जळगावऐवजी उतरल्या नंदुरबारलागांजाचा व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांनी या व्यवसायात शंका येऊ नये यासाठी महिलांना पुढे केले आहे. शहरातील दोन्ही गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत, हे विशेष. पुरी-ओखा या एक्सप्रेसमध्ये गांजा सापडल्या त्या आरक्षित सीटपासून काही अंतरावर दोन महिलाही होत्या. या दोन्ही महिला जळगाव शहरातीलच असून सुरुवातीपासून गांजासोबत होत्या.नंतर या महिलाही तेथून गायब झाल्या, पुढे या महिला नंदुरबार येथे उतरल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाने आरक्षित सीट कोणाच्या नावाने आहे, कुठून आरक्षित केलेले आहे तसेच सुरुवातीचे सीसीटीव्ही फुटेज मिळवायला सुरुवात केली आहे.पोलिसांना टीप दिल्यावरुन वादरेल्वे स्टेशनवर गांजा पकडल्यानंतर त्याच दिवशी रात्री जाखनी नगर भागात दोन गटात कडाक्याचे भांडण झाले होते. पोलिसांना टीप दिल्याच्या कारणावरुन हा वाद झाला होता, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. दरम्यान, कंजरवाड्यातूनच कारागृहात देखील गांजा पोहचविला जात असल्याची चर्चा आहे. काही महिन्यापूर्वी पोलिसांनी एका तरुणाला पकडलेही होते.आठवड्यातून दोन दिवस येतो गांजाविशाखापट्टणम येथून जळगावसाठी आठवड्यातून दोन दिवस एक्सप्रेस असते. रविवार व गुरुवारी या गाड्या तेथून सुटतात. विशाखापट्टणम येथील चित्तपल्ली, अंकपल्ली, मदगिरी व गाजवटा येथून हा गांजा जळगाव शहरात आणला जातो. म्हसावद (ता.जळगाव) येथील एका तरुणाला चार महिन्यापूर्वी ट्रकसह ओडिसा पोलिसांनी पकडलेले आहे. त्यात २० क्विंटल गांजा होता, आजही तो तरुण ओडिसा येथे कारागृहात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव