शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोना नष्ट करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचा सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:17 IST

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन

जळगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. यापुढील काळातही जिल्ह्यातील कोरोनाची महामारी नष्ट करण्यासाठी महामंडळाचा सक्रीय सहभाग आवश्यक असून मंडळांनी आरोग्य विषयक सामाजिक उपक्रमांना मदत करुन येणारा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.सार्वजनिक गणेशोत्सव २०२० ची पूर्वतयारी समन्वय बैठक जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे आदी उपस्थित होते.नागरिक व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करायंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबत मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होवू नये याकरीता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिक व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करावे. नागरिकांच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी मंडळांनी काम करतानाच कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रमात रक्तदान, प्लाझ्मा दान विषयक जनजागृती, रुग्णांना मोफत सकस आहार पुरविणे, घरपोच आरोग्य तपासणी करण्याबरोबरच ग्रामपंचायत स्तरावर किवा प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आॅक्सिजनची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांकरीता तत्काळ आॅक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी आॅक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.गणेशोत्सव सुरक्षित व संयमाने साजरा करुयाशासनाच्या मार्गदशक सूचनांचे पालन करुन येणारा गणेशोत्सव साधेपणाने, सुरक्षित व संयमाने साजरा करुया. गणेशमूर्तीची उंची ४ फुटापेक्षा अधिक नको, पूजा व आरतीसाठी ५ पेक्षा अधिक व्यक्ती नको, पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या ठिकाणी गर्दी करु नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, आवश्यक त्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले.गांभीर्य आणि पावित्र्य राखून गणेशोत्सव साजरा करुयाशासनाच्या नियमांनुसार सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असल्याने मंडळांनी लवकर अर्ज सादर करावे, सार्वजनिक मंडळांनी विर्सजनाच्या दिवशी घरगुती गणपतींचे दान स्वीकारावे, जेणेकरुन विर्सजनाच्यावेळी होणारी गर्दी टाळता येईल, आगमन व विर्सजन मार्गावर आवश्यक त्या सुविधा महापालिका उपलब्ध करुन देईल, मंडळांनी शासनाच्या नियमांचे गांभीर्य ओळखून व गणेशाचे पावित्र्य राखून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले.आरोग्य उत्सव म्हणून साजरा करणारकोरोनाच्या महामारीचे सर्वांसमारे आव्हान आहे. चांगल्या सामाजिक उपक्रमांची पूजा मांडून कोरोनाच्या पार्श्वभूीवर साजरा होणारा गणेशोत्सव सर्व मंडळे आरोग्य उत्सव म्हणून साजरा करतील. तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले जाईल, असे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी सांगितले. यावेळी मुकुंद मेटकर, वैभव पाटील, दीपक जोशी, हेमंत महाजन, सुरेश दायमा यांनीही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती सर्वांना सादरीकरणाद्वारे दिली. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार रवी मोरे यांनी मानले.

टॅग्स :Jalgaonजळगाव