जळगावात १ लाख प्लॅस्टिक बाटल्यांपासून दीड एकरावर साकारणार गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 20:16 IST2018-08-31T20:13:11+5:302018-08-31T20:16:02+5:30
डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाचा प्रकट कार्यक्रम व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने पाण्याच्या रिकाम्या १ लाख प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून एकलव्य क्रीडासंकुलाच्यादीड एकर क्षेत्रावर श्री गणपतीचे म्युरल तयार करण्यात येत आहे.

जळगावात १ लाख प्लॅस्टिक बाटल्यांपासून दीड एकरावर साकारणार गणपती
जळगाव : डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाचा प्रकट कार्यक्रम व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने पाण्याच्या रिकाम्या १ लाख प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून एकलव्य क्रीडासंकुलाच्यादीड एकर क्षेत्रावर श्री गणपतीचे म्युरल तयार करण्यात येत आहे. ३६ तास चालणाऱ्या या म्युरलच्या निमित्ताने एशिया बुक आॅफ रेकॉर्ड होणार असल्याची माहिती केसीईच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी शुक्रवारी मू.जे.महाविद्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
के.सी.ई.सोसयटीच्या ओजस्विनी फाईन आर्टस्, एकलव्य क्रीडा संकुल, मुलींचे व मुलांचे वसतीगृह, अध्यापक विद्यालय, ओरिआॅन सीबीएसई स्कूल, ओरिआॅन इंग्लिश मीडियम स्कूल,ए.टी.झांबरे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचाºयांनी प्लॅस्टिकच्या एक लिटरच्या एक लाख बाटल्यांचे संकलन केले आहे.
एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर श्री गणपतीचे म्युरल तयार करण्यात येणार आहे. ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून १२ रोजी दुपारी १२ या दरम्यान ५० स्वयंसेवक हे दीड एकर क्षेत्रावर हे म्युरल तयार करणार आहेत. या उपक्रमास दिल्ली येथील ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् व फरिदाबाद येथील ‘एशिया बुक आॅफ रेकॉर्डस्’ या संस्थांची कायदेशीर मान्यता घेण्यात आली आहे. यासाठी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून डॉ.ममता काबरा व त्यांचे सहकारी उपस्थित राहतील.