शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

लॉकडाउननंतर इंधन विक्रीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 5:17 PM

सर्वसामान्यांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री बंद केल्यानंतर दोन्हींच्या विक्रीमध्ये ते ६० ते ७० टक्क्यांनी घट झाली आहे.

ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल विक्री ६० ते ७० टक्क्यांनी घटलीवेळेच्या मर्यादेमुळेही विक्रीवर आली बंधने

डिगंबर महालेअमळनेर, जि.जळगाव : सर्वसामान्यांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री बंद केल्यानंतर दोन्हींच्या विक्रीमध्ये ते ६० ते ७० टक्क्यांनी घट झाली आहे.याबाबत येथील पेट्रोल पंपचालक लालचंद सैनानी यांनी सांगितले की , माझ्या पेट्रोल पंपावर रोज साडेतीन हजार लीटर पेट्रोल तर आठ ते नऊ हजार लीटर डिझेल विक्री होत होती. हल्ली लॉकडाऊन झाल्यानंतर हजार ते बाराशे लीटर पेट्रोल व अडीच-तीन हजार लीटर डिझेल विक्री होत आहे. याची कारणमीमांसा देताना ते म्हणाले की, हल्ली रोडकाम करणारे कंत्राटदार व मजूर, क्रशर मशीन वीट भट्टी, बाहेरगावी फिरस्ती करणारे, पॅसेंजर वाहू गाड्या बंद आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल यांच्या खपावर खूप मोठा परिणाम झाला आहे. अत्यावश्यक सेवांपुरतेच वाहनांना आम्ही बॅचेस पाहून पेट्रोल-डिझेल देतो. त्यात दूध वाहक, किराणा व्यावसायिक, मेडिकल व्यावसायिक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पोलीस पत्रकार, किराणा दुकानदार यांना बॅचेस पाहून पेट्रोल-डिझेल देत आहोत. शिवाय पेट्रोल पंप यापूर्वी १७ ते १८ तास सुरू असायचा. आता फक्त सकाळी सात ते दहा आणि दुपारी चार ते सहा इतकाच वेळेपर्यंत पेट्रोल पंप सुरू असतो. वेळेत घट झाल्यामुळेसुद्धा व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. परंतु सर्वाधिक परिणाम हा लॉकडाऊनमुळे झालेला आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपAmalnerअमळनेर