शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस चार वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 22:21 IST

अमळनेर न्यायालयाचा निकाल

अमळनेर : चोपडा तालुक्यातील हातेड बुद्रूक येथील एका ९ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाºया ४७ वर्षीय आरोपी सुदर्शन शहादू शिरसाठ यास ंअमळनेर येथील न्यायालयाने ४ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.हातेड बुद्रूक येथील एक ९ वर्षीय बालिका १ सप्टेंबर १७ रोजी सायकलवरून आपल्या मैत्रिणीकडे अभ्यासाला जात असताना तिच्या आजीने तिला दुकानावरून कुरकुरे आणायला सांगितले असता, दीपक नावाच्या मुलाचे वडील सुदर्शन याने तिला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केले.दुसºया दिवशी तिच्या आईने अंघोळ करून तिला कपडे घालत असताना तिच्या छातीवर ओरखडे पडलेले तिला दिसले. तेव्हा तिने त्याबाबत विचारणा केली असता ती घाबरली व नंतर तिने हकीगत सांगितली. त्यावरून चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला अमळनेर येथील सत्र न्यायालयात सुरू होता. न्या. विक्रम आव्हाड यांनी आरोपीला बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत कलम ४ नुसार चार वर्ष कैद व पाच हजार रुपये दंड , दंड न भरल्यास ६ महीने शिक्षा तसेच वरील कायद्यांचे कलम १२ नुसार दोन वर्ष कैद व तीन हजार रुपये दंड , दंड न भरल्यास तीन महीने शिक्षा ठोठावली.वरील शिक्षा एकत्रित भोगावयाची आहे. दंडाच्या रकमेंपैकी ६ हजार रुपये पीड़ित मुलीस देण्याचा हुकुम केला आहे. सदरच्या खटल्याचे कामकाजात सरकारी वकील किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला. त्यांनी १० साक्षीदार तपासले. चोपड़ा ग्रामीणचे पीएसआय एन. यू दाभाड़े, पोलिस नाईक महेश पाटील, पीएसआय कांचन काळे यांनी सदर गुह्याचा तपास केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव