बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस चार वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 22:21 IST2019-01-11T22:20:45+5:302019-01-11T22:21:15+5:30
अमळनेर न्यायालयाचा निकाल

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस चार वर्षाची शिक्षा
अमळनेर : चोपडा तालुक्यातील हातेड बुद्रूक येथील एका ९ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाºया ४७ वर्षीय आरोपी सुदर्शन शहादू शिरसाठ यास ंअमळनेर येथील न्यायालयाने ४ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
हातेड बुद्रूक येथील एक ९ वर्षीय बालिका १ सप्टेंबर १७ रोजी सायकलवरून आपल्या मैत्रिणीकडे अभ्यासाला जात असताना तिच्या आजीने तिला दुकानावरून कुरकुरे आणायला सांगितले असता, दीपक नावाच्या मुलाचे वडील सुदर्शन याने तिला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केले.
दुसºया दिवशी तिच्या आईने अंघोळ करून तिला कपडे घालत असताना तिच्या छातीवर ओरखडे पडलेले तिला दिसले. तेव्हा तिने त्याबाबत विचारणा केली असता ती घाबरली व नंतर तिने हकीगत सांगितली. त्यावरून चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला अमळनेर येथील सत्र न्यायालयात सुरू होता. न्या. विक्रम आव्हाड यांनी आरोपीला बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत कलम ४ नुसार चार वर्ष कैद व पाच हजार रुपये दंड , दंड न भरल्यास ६ महीने शिक्षा तसेच वरील कायद्यांचे कलम १२ नुसार दोन वर्ष कैद व तीन हजार रुपये दंड , दंड न भरल्यास तीन महीने शिक्षा ठोठावली.
वरील शिक्षा एकत्रित भोगावयाची आहे. दंडाच्या रकमेंपैकी ६ हजार रुपये पीड़ित मुलीस देण्याचा हुकुम केला आहे. सदरच्या खटल्याचे कामकाजात सरकारी वकील किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला. त्यांनी १० साक्षीदार तपासले. चोपड़ा ग्रामीणचे पीएसआय एन. यू दाभाड़े, पोलिस नाईक महेश पाटील, पीएसआय कांचन काळे यांनी सदर गुह्याचा तपास केला होता.