चारचाकी चोर गड्या आणि त्याचा साथीदार विशाल पोलिसांच्या जाळ्यात, अजिंठा चौफुली परिसरातून घेतले ताब्यात

By विजय.सैतवाल | Updated: February 14, 2024 00:52 IST2024-02-14T00:51:22+5:302024-02-14T00:52:11+5:30

एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कार चोरी झाली होती.

Four wheeler thief Gadya and his accomplice Vishal in police net, Ajintha arrested from Chauphuli area | चारचाकी चोर गड्या आणि त्याचा साथीदार विशाल पोलिसांच्या जाळ्यात, अजिंठा चौफुली परिसरातून घेतले ताब्यात

चारचाकी चोर गड्या आणि त्याचा साथीदार विशाल पोलिसांच्या जाळ्यात, अजिंठा चौफुली परिसरातून घेतले ताब्यात

जळगाव : एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कार चोरी प्रकरणी जळगाव शहरातील कालिपिली चालविणाऱ्या चंद्रकांत उर्फ गड्या गोरख चौधरी (२७) व त्याचा साथीदार विशाल लक्ष्मण माळी (२५, दोघ रा. अयोध्यानगर) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत चोरीची कार जप्त केली आहे.

एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कार चोरी झाली होती. कार चोरी करणारे चोरटे हे अजिंठा चौफुली परिसरात कालिपिली चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ सुनील दामोदरे, गोरख बागुल, रफीक शेख, महेश महाजन, संदीप सावळे, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे, भगवान पाटील, राहुल बैसाणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी यांच्या पथकाने  अजिंठा चौफुलीवरुन चंद्रकांत उर्फ गड्या चौधरी व विशाल माळी यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेली कार काढून दिली. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
 

Web Title: Four wheeler thief Gadya and his accomplice Vishal in police net, Ajintha arrested from Chauphuli area