जिल्ह्यात दोन अपघातात चार जण ठार, गुलाबवाडी आणि वर्डीतील दोन सख्ख्या भावांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 01:16 IST2025-09-09T01:16:02+5:302025-09-09T01:16:21+5:30

यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. यातील एक नवविवाहित आहे...

Four people killed in two accidents in the jalgaon district, including two brothers from Gulabwadi and Vardi | जिल्ह्यात दोन अपघातात चार जण ठार, गुलाबवाडी आणि वर्डीतील दोन सख्ख्या भावांचा समावेश

जिल्ह्यात दोन अपघातात चार जण ठार, गुलाबवाडी आणि वर्डीतील दोन सख्ख्या भावांचा समावेश

जळगाव :  जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. यातील एक नवविवाहित आहे. पहिला अपघात अभोडा ता. रावेरनजीक सोमवारी सायंकाळी ४ वाजता तर दुसरा अपघात वर्डी- माचला ता. चोपडानजीक सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता झाला.

रामदास प्रकाश बारेला (१९) आणि करण प्रकाश बारेला ( आठ वर्षे, रा. गुलाबवाडी ता. रावेर) हे सख्खे भाऊ अभोडानजीक तर मगन जगन बारेला (२५) व रगन जगन बारेला (१८, रा. वर्डी ता. चोपडा) अशी वर्डीनजीकच्या अपघातात ठार झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. रामदास बारेला याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते.

रामदास व करण हे रसलपूर ता. रावेर येथे बहिणीला भेटण्यासाठी गेले होते. तिथून दुचाकीने परत येत असताना अभोडा गावानजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली, त्यात दोघे जण ठार झाले. तर वर्डी-माचला फाट्यादरम्यान मगन आणि रगन बारेला यांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. यात दोघे जण ठार झाले. या अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Four people killed in two accidents in the jalgaon district, including two brothers from Gulabwadi and Vardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.