यावल, जि. जळगाव - यावल येथे चार ठिकाणी चोरट्यांनी बंद घराचे दरवाजे तोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली.यावल येथील चांद नगरातील तीन तर आयशा नगरातील एक अशा चार घरांमध्ये चोरट्यांनी चोरी केली. यात सैयद इरफान निजामोद्दीन यांच्या घरातील १५ तोळे सोन्याचे तर १०० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच १० हजार रुपयांची रोकड लंपास केली. अन्य घर मालक बाहेर गावी गेले असल्याने चोरीचा ऐवज समजू शकला नाही.
यावल येथे चोरट्यांनी फोडले चार घरे, १५ तोळे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:07 IST