शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ८५६ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ८५६ शेतकऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. यासोबतच लॉकडाऊनमुळे यंदा ही संख्या वाढली आहे.

निसर्गाची अवकृपा, महागडे बियाणे, पेरणी करून न उगविलेले पीक, गेल्या वर्षी झालेला अतिपाऊस, दुबार पेरणी या साऱ्यात शेतकऱ्याच्या हातातून खरीप हंगाम गेला. तसेच कर्जमाफीबाबतही अनिश्चितता यामुळे खाजगी सावकार व सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत बळीराजा पडला. या साऱ्यात खचलेल्या बळीराजाने मृत्यूला कवटाळले व ८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

लॉकडाऊनच्या काळात वाढली संख्या

गेल्या पाच वर्षांतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता ती वाढतच गेली. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळातही आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व जण घरी होते. मात्र बळीराजाची विवंचना काही संपली नाही. कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी पैसा कसा उभा करायचा या विवंचनेत शेतकरी सापडला. यासोबतच बँकांसमोर असलेल्या रांगा पाहता कर्ज कसे उपलब्ध होणार यामुळे चिंतेत भर पडली. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मार्च ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

अनुदानही झाले होते ‘लॉक’

लॉकडाऊनच्या काळात प्रवास बंद झाल्याने समिती सदस्य येणे शक्य नसल्याने व शासनाने कार्यालयातील उपस्थिती, बैठकांवर घातलेले निर्बंध यामुळे शेतकरी आत्महत्या अनुदान वाटप जिल्हास्तरीय समितीची बैठकही होऊ शकली नव्हती. त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कोरोनाच्या संकटाने मदतही मिळू शकत नव्हती. त्यानंतर मात्र ऑगस्टपासून बैठका सुरू झाल्याने प्रकरणे मार्गी लागू लागली.

४०९ जणांना मदत

पाच वर्षांत जिल्ह्यात ८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर शेतकरी आत्महत्या अनुदान वाटप जिल्हास्तरीय समितीकडे मोबदल्यासाठी प्रकरणे दाखल झाली. त्यावर निर्णय होऊन ४०९ शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आली. मात्र वेगवेगळ्या कारणांनी ४४७ प्रकरणे अपात्र ठरली.