शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

पाच विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

By admin | Updated: November 17, 2014 12:17 IST

'महाजेनको' कंपनीतर्फे त्रिमूर्ती इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी कनिष्ठ पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पाच विद्यार्थ्यांजवळ आधारकार्ड नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

जळगाव : 'महाजेनको' कंपनीतर्फे त्रिमूर्ती इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी कनिष्ठ पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पाच विद्यार्थ्यांजवळ आधारकार्ड नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. 
ऑनलाइन होणार्‍या स्पर्धा परीक्षेसाठी आता आधारकार्ड आणण्याची सक्ती केली जात आहे. सत्य प्रत परीक्षार्थीजवळ नसेल तर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जात नसून त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्रिमूर्ती इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी दुपारी २ ते ३.३0 दरम्यान घेण्यात महाजेनकोतर्फे पेपर घेण्यात आला. बाहेरगावाहून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांजवळ हॉल तिकीट होते. मात्र, पाच विद्यार्थ्यांजवळ आधारकार्डची छायांकित प्रत असल्यामुळे परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही, त्यामुळे परीक्षार्थींचा हिरमोड झाला. 
१0 विद्यार्थी गैरहजर 
या परीक्षेसाठी ७0 विद्यार्थी प्रविष्ट होते. ५५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पाच विद्यार्थ्यांजवळ ओळखपत्र (आधारकार्डची सत्यप्रत) नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. उर्वरित १0 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. 
४८0 विद्यार्थ्यांनी दिली पशुधन पर्यवेक्षक पदाची परीक्षा 
दरम्यान, जिल्हा परिषदेतील पशुधन पर्यवेक्षक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत ४८0 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सकाळी दहा ते साडेअकरा या दरम्यान पेपर झाल्यानंतर दुपारी २ ते ३.३0 या दरम्यान कनिष्ठ सहायक लेखा व कनिष्ठ सहायक लिपिकपदाची परीक्षा झाली. 
या परीक्षेत २७१ परीक्षार्थींपैकी १७४ परीक्षार्थी हजर होते. ९७ परीक्षार्थींनी परीक्षेला दांडी मारली.